मतदान जनजागृती सायकल रॅलीमध्ये एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेटचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 Oct 2023, 9:09 AM
   

जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी शहरात शुक्रवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. कॅडेटनी उस्फूर्त असा सहभाग दर्शविला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एन. सी. सी. चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, महापालिका उपायुक्त गीता वंजारी आदी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. रॅलीत मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मी मतदार नोंदणी केली आहे. आपण केली का अशा फलकांसह व घोषणा नोंदविलेले टी-शर्ट परिधान करून एल. आर. टी. कॉलेज चे एन. सी. सी. कॅडेट सार्जंट स्वराज बोदडे, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट अभिषेक बोराळे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट आयुष अंबरकर, कॅडेट आयुष थोरात, कॅडेट शुभम दुबे, कॅडेट प्रवीण सोळंकी, कॅडेट अजित वर्मा, कॅडेट अविनाश वाकोडे सहभागी झाले होते. ही रॅली अशोक वाटिका, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाइन चौक, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी रोड मार्गाने पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची व एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेटला या सायकल रॅलीबद्दल मार्गदर्शन करून त्यांना मतदार जनजागृतीसाठी प्रोत्साहित केले.

    Post Views:  121


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व