निष्काम कर्मयोगी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती म्हणजे विभूती पूजा होय- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्रजी भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Nov 2024, 2:38 PM
पुणे : भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल कायदे पंडित होते , त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी व सत्कर्म करण्यासाठी निरंतर केला. त्यांनी 565 संस्थानिकांना एकत्र आणून भारत एकसंध ठेवण्याची महान किमया केली ते केवळ आपल्या आपल्या उसदी राजकीय बुद्धिमत्तेद्वारे व आपल्या ज्ञानाद्वारे. ते महान ज्ञान योगी होतें.त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रासाठी आपला देह झिजविला व रात्रंदिवस सत्कर्म करून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला, सत्याग्रहामध्ये भाग घेतला, विविध चळवळी केल्यात, अनेक पूरग्रस्तांना, प्ले गग्रस्तांना, शेतकऱ्यांना शेतमजुरांना, वंचितांना व समाजातील गरीब घटकांसाठी रात्रंदिवस ते लढले ,झगडले आणि त्यांना विविध मूलभूत गरजा भागवण्यासाठी परिश्रम घेतले. सरदार थोर स्वातंत्र्य सेनानी तर होतेच पण महान कर्मयोगी सुद्धाहोते .त्याचप्रमाणे स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास सहन करावा लागला परंतु त्यांनी आपला सत्वगुण सोडला नाही,भक्ति हा गुण सोडला नाही, तुरुंग मध्ये असताना त्यांनी भगवद्गीता व रामायण ते नेहमी वाचत असत.नवविधा भक्तीतील वाचन भक्ती हा योग त्यांनी साधला .सरदार वल्लभ भाई पटेल हे ज्ञानयोग ,कर्मयोग भक्तीयोग ,साधणारे एक महान तपस्वी होते.ते जन्मभर गीतेतील अध्याय दुसऱ्या मधील ओवि 47 नुसार निष्काम कर्मयोग जगले. असे महान निष्काम कर्मयोग सरदार वल्लभाई पटेल निष्काम कर्मयोगी होते . निष्काम कर्मयोगी सरदार वल्लभभाई पटेल हे महान विभूती होते .वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूती पूजा आहे ,असे मत जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.डॉ मणी भाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित भारत सरकार संस्थेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती, व राष्ट्रीय एकात्मता दिन, तसेच सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यस्तरीय व राष्ट्रीय मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले . आपल्या भाषणात डॉक्टर रवींद्र भोळे पुढे म्हणाले की सरदार वल्लभ भाई पटेल यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली, हिंदुत्वाचे ऊर्जा स्तोत्र, व अखंड भारत राष्ट्राचे शिल्पकार हिंदू राष्ट्राचे शिल्पकार म्हणजे सरदार वल्लभाई पटेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते पुढे म्हणाले की सरदार वल्लभ भाई पटेल यांना डायाभाई व मनीबेन अशी दोन अपत्ये असताना ,त्यांनी सत्ता संपत्तीचा मोह धरला नाही. असे हे जागतिक पातळीवरचे महान नेतृत्व आपल्या देशामध्ये होऊन गेले याचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असावा. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सिताराम राणे, डॉ. सुनील पाटील वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, अमोल पाटील,डॉ हेमंत झोपे विजय खर्चे त्रिवंदा पुरोहित हभप मधुकर जाधव, हभप दिलीप शंकर पाटील , ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद जी खर्चे पत्रकार व ज्योतिष,प्रतीक गंगने ज्येष्ठपत्रकार,दिनकर चौधरी, सुभाष कट्यारमल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे, निरंतर राष्ट्रसेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रधान समारंभ झाला.त कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचे शुभ हस्ते भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सुशील कुमार सरावगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली, राहुल कुमार गोयल केंद्रीय महामंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली यांना राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल हिन्दू रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कारही वितरण करण्यात आले. डॉ. सुनील वासुदेव पाटील( वैद्यकीय )अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, माननीय श्री सिताराम गणपत राणे (सामाजिक, )कार्याध्यक्ष समता भातृ मंडळ पिंपरी चिंचवड पुणे, माननीय श्री विजय वासुदेव खर्चे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अकोला, श्री विकास लीलाधर वारके (सामाजिक) लेवा भात्रू मंडळ मंडळ अध्यक्ष पिंपळे सौदागर पुणे, माननीय श्री हेमंत श्रीरंग झोपे, (सामाजिक) क्षेत्र अध्यक्ष समता भ्रतृ मंडळ पिंपरी चिंचवड पुणे, डॉ. श्री सभापती गिरिजा शंकर शुक्ला( वैद्यकीय) क्षेत्र अकोला, माननीय डॉ. राजेश नारायण घाटकर (वैद्यकीय )चाकण पुणे, प्रतिक गंगणे ज्येष्ठ पत्रकार व संपादक ,प्रल्हाद गोपाळ खर्चे ज्येष्ठ( पत्रकार ,ज्योतिष) पुणे , अमोल विष्णू पाटील (अध्यात्मिक क्षेत्र) पुणे, उमेश श्रीरंग फिरके (सामाजिक) पुणे, श्री चेतन सोनवणे प्राचार्य एंजल हायस्कूल( शैक्षणिक कार्य )पुणे, श्री राजे खान पटेल ज्येष्ठ पत्रकार पुणे, युवाश्री अनिल नामदेव डाहेलकर कर (सामाजिक )मूर्तीजापुर, सतीश सांबसकर (पत्रकार)संपादक साप्ताहिक वैराग्यमूर्ती दर्यापूर, ह भ प मधुकर दिनकर जाधव( आध्यात्मिक) आगाशिवनगर, ह भ प श्री दिलीप शंकर पाटील (आध्यात्मिक) भोगाव सांगली, ऋषिकेश श्रीकृष्ण भाले,( आध्यात्मिक )डाळिंब दौड, दिनकर बळीराम चौधरी( सामाजिक पुणे,) सुनील गोविंदा ढाके (आरोग्य सेवा) नशिराबाद जळगाव, सागर रवींद्र बागुल (सामाजिक बँकिंग सेवा) भुसावळ, कादंबरी वसंतराव नलावडे (पत्रकरीता सामाजिक) पुणे, सुनंदा किरण डेरे (शैक्षणिक सामाजिक )पुणे, श्रीमती रेखा विनायक आखाडे (सामाजिक) पुणे, सौ सुविधा सुनील नाईक (सामाजिक )पुणे, संतोष बाबुराव नातू राहू पिंपळगाव दौंड, खलील महबूद शेख( सर्पमित्र) उरळीकांचन,डॉ. कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी (योगा निसर्गोपचार )पिंपरी चिंचवड पुणे, श्री संदीप कचरू ढेरंगे (सामाजिक कार्य )कोरेगाव भीमा, माननीय श्री रमेश लक्ष्मण गायकवाड( शैक्षणिक) अनगर, ह भ प लक्ष्मण महाराज गोलांडे (अध्यात्मिक) संभाजीनगर, मधुकर गंगाधर भागवत( कृषी) शेवगाव अनगर, सुभाष केशव खोसे (कृषी सेवा )शेवगाव नगर, विलास मारुती कर्डिले (सामाजिक कार्य )शिरूर, अरुणराव दिगंबरराव देऊळगावकर (आध्यात्मिक) अनगर, सोपानराव विलासराव ढोरकुले (सामाजिक) शेवगाव अनगर, राहुल कुंडलिक शिरुरे (सामाजिक )मनोरुग्ण लातूर, श्रीमती छाया जयवंत सर्व दे( अपंग शेत्र )शिरूर पुणे, रवींद्र शिवाजी जोशी( दिव्यांग क्षेत्र) पुणे, अशोक रामचंद्र नांगरे (क्रिडा क्षेत्र )धनकवडी, भागवत अशोक गोलांडे (सामाजिक) आळंदी, हरिश्चंद्र शंकरराव गायगोले (शैक्षणिक) अमरावती, राजाराम मारुती जगताप( दिव्यांग शेत्र )पुणे, सुभाष जीवा राठोड (कलाक्षेत्र) वर्धा, विजय दामोदरराव ढोरे अध्यात्मिक धार्मिक कार्य अकोला, सुनील मनोहर पाटील (शैक्षणिक )क्षेत्र चिंचोली पंढरपूर, विठ्ठल नारायण शिंदे( धार्मिक कार्य )आळंदी पुणे, संतोष दिगंबर चिंचोळकर( दिव्यांग सेवा) विरारपाल, सुनील शेठ दाभाडे (सामाजिक कार्य )हडपसर पुणे, अनिल गोविंद भिलारे (सामाजिक कार्य )लोणावळा पुणे, संजय देवराम सांगळे (पोलीस सेवा), हरीश लक्ष्मण अवचर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) मुंबई, अंकुश दामोदर भरत (शैक्षणिक क्षेत्र) मुरबाड ठाणे, एनुद्दीन अकबर काझी (शैक्षणिक) बारामती, सो मनीषा नितीन पाटील( शैक्षणिक) जुन्नर, सम्राट विजय भालेराव (तांत्रिक )कोंडा, सुनील जगताप (अध्यात्मिक) दौंड, बाळकृष्ण भिमराव लोखंडे( तांत्रिक) सहफळ, प्रकाश मारोती मुंडे (अध्यात्मिक) मढेवडगाव, किशोर जगन्नाथ लडकत (अध्यात्मिक) ग्रीरीम, नितीन न्यानोबा कुंजीर (आदर्श शेतकरी)कुंजीरवाडी, बाळासाहेब सोनबा बनकर( आदर्श शेती )गिरीम, सिद्धार्थ लाला साळवे (तांत्रिक) मढेवडगाव, बापूसाहेब महादू शिंदे (शैक्षणिक )ठाणे, बाळासाहेब तुकाराम बानखेले( सामाजिक )ठाणे, दिलीप गुलाब हांडे (सामाजिक) ठाणे, ह भ प पुरुषोत्तम महाराज हिंगणकर (अध्यात्मिक) चिखली पुणे, सीमा सचिन चव्हाण (सामाजिक आदर्श आशा सेविका )उरुळी कांचन, अंजू कोंडीराम सोनवणे (सामाजिक शैक्षणिक )पुणे, सौ डॉ शितल भागवत जाधव (शैक्षणिक सामाजिक )पुणे, शशिकांत मनोहर कवडे पाटील 92 समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या राष्ट्रसेवकांना भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एलडी साळवे यांनी केले कार्यक्रमाच्या आभार सुभाष कट्यारमल यांनी केले. नॉर्मल नॉर्टन,अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, या कार्यकर्त्यांनी स्टेजवरील धुरा सांभाळली. हा कार्यक्रम ज्ञानवती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह लोहिया नगर पुणे येथे संपन्न झाला.
Post Views: 50