भ्रातृमंडळ अकोला चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Dec 2025, 12:55 PM
   

अकोला : भ्रातृमंडळ, प्रभा लेआऊट, रणपिसे नगर, अकोला या सामाजिक संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दिनांक 21.12.25 रोजी खंडेलवाल भवन अकोला येथे अत्यंत आनंदात संपन्न झाला.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पाहुणे श्री भास्कर चांगो पाटील यांचा सत्कार करण्यात आला. परंपरेनुसार जेष्ठ नागरिकांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकोला पूर्व चे मा. आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांचे स्वागत  मंडळाध्यक्ष डॉ. श्री एम एन पाटील यांनी केले, तसेच प्रमुख पाहुणे भाजप महानगरअध्यक्ष आणि माजी मनपा सभापती, लोकप्रिय नेते श्री जयंत भाऊ मसने यांचे स्वागत मंडळ उपाध्यक्ष प्रा. श्री राजीव इंगळे यांनी केले.  सामाजिक बांधिलकी आणि बंधुभाव जपण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच आनंद लुटला. सर्व मंडळ पदाधिकारी, सदस्यगण आणि महिलामंडळाच्या अथक परिश्रमाने पार पडलेल्या कार्यक्रमास निमंत्रित परिवारांची लक्षणीय उपस्थिती होती. सादरकर्त्यांना बक्षीसे देण्यात आली. स्नेहसंमेलनानंतर श्री नरेंद्र पाटील (बांधकाम व्यवसायीक, अकोला), श्री विकासभाऊ चोपडे  (विजय गॅस एजन्सी, माधव नगर, अकोला) आणि भ्रातृमंडळ यांचे संयुक्त देणगीतून स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

    Post Views:  84


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व