कापशी गावात नव्या दिव्यांनी सहा महिन्यांनंतरही नाही पडला प्रकाश


ग्रामस्थ म्हणतात.....हायमास्ट लाईट फक्त शोभेचे काय?
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Feb 2024, 10:00 AM
   

(मंगेश चऱ्हाटे) कापशी : येथील उडाणपुलावर व  चौकात अंधारमय ठिकाणी प्रकाश पडावा या हेतूने माॅन्टो कार्लो कंपनीकडून महामार्गाचे व उडाणपुलाचे काम करुन   रस्त्याच्या बाजूला हायमास्ट लाईट लावला. उडाणपुल सुरु पासुन ते संपेपर्यंत व गावाच्या बाजुला व बाहेरील भागावर तसेच उडाणपुलाखाली  अनेक  खांबावर चाळीस  ते  पंन्नास मोठे पथदिवे लावले आहेत. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यातून प्रकाश पडलेला नाही. परिणामी हे हायमास्ट खांब शोभेसाठी उभारला काय? असा सवाल कापशी रोडवासी विचारीत आहेत.
याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता हायमास्ट खांब कधी लागला हेही माहीत नाही. तो खांब संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने उभारला. त्याला विजेचा पुरवठासुद्धा त्यांनीच करावा तेव्हाच ते सुरू होऊ शकते, असे मत सरपंच यांनी व्यक्त केले.
तब्बल सहा महिन्यांपासून शोभेची वास्तू ठरणारे हे हायमास्ट कधी सुरु होतील याकडे कापशी सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत. 
*चौकट*
बांधकामाला गती मिळेना
गावातील महामार्गाच्या बांधकामाला गती मिळालेली नाही. परिणामतः आज पण  उडाणपुला खालील गावाकडील रस्ताचे काम अर्धवट आहे  लहान  मोठी दुकानदार मंडळी यांच्यामुळे त्रस्त आहेत. 
**कोड**
कापशी रोड येथे उडाणपुल झाल्याने आमच्या गावातील सर्वच धंद्यावर परिणाम झाला आणि रात्री च्या वेळी उडाणपुलावर व खाली अंधाराचे साम्राज्य असल्याने लवकरच दुकान बंद करावी लागतात त्यामुळे आमचा उदर्वाह कसा भागणार कंपनीच्या वतीने लवकर पथदिवे लावण्यात यावे 
संजय केवट व्यावसायिक कापशी रोड

    Post Views:  230


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व