येणेरे (जून्नर) येथील विकास घोगरे यांची मुंबई मध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये दुसरा क्रमांकाची बाजी


सोबत मिस्टर पीपल्स चॉईसचा पुरस्कार सुद्धा पटकावला!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 May 2025, 9:36 AM
   

मुंबई — स्वप्नांची माया नगरी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आणि तिचं झगमगणारं बॉलीवूड हे अनेकांच्या मनात आकर्षणाचं केंद्र आहे. नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या या  झगमगत्या दुनियेत दररोज हजारो संख्येने अनेक तरुण-तरुणी आपलं नशीब जमावण्यासाठी मुंबईकडे धाव घेतात. अशाच या ग्लॅमरस दुनियेत पुण्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील येणेरे गावचे सुपुत्र  श्री विकास बाजीराव घोगरे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या स्पेशल 40 च्या फॅशन शोमध्ये विकास घोगरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्या सोबतच त्यांना मिस्टर पीपल्स चॉईस हा विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उपस्थित प्रेक्षकांनी निवडलेल्या आवडत्या स्पर्धकाला दिला जातो.
या फॅशन शोमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी नाव नोंदविले होते. त्यापैकी एकूण १५ महिला व १६ पुरुष स्पर्धक अशा एकूण ३१ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.  विविध फेऱ्यांमधून यशस्वीरीत्या पुढे जात विकास घोगरे यांनी प्रथम टॉप ८ मध्ये स्थान मिळवले, त्यानंतर टॉप ४ मध्ये आणि अखेरीस द्वितीय क्रमांक पटकावला.
विकास घोगरे हे केवळ एक मॉडेल नसून  ते नंदनवन प्रकल्पांतर्गत 18 वर्षापुढील बौद्धिक अक्षम (मतिमंद) मुलांचा सांभाळ करत आहेत, त्यांनी दिव्यांग सेवेसोबत आपल्यातील कलागुणांनाही जपले आहे. जुन्नरकरांसाठी ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद असून, श्री विकास घोगरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विश्वप्रभातकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

    Post Views:  45


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व