स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ रंग भरो स्पर्धा


सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड तर्फे आयोजन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Jul 2023, 5:08 PM
   

कुरणखेड - ज्यांची कर्मभूमी कुरणखेड असे साहित्यिक लेखक तथा चित्रपट निर्माते कुरणखेड गावाचे भूमिपुत्र स्वर्गीय  डॅडी देशमुख यांचे कुरणखेड गावासह जिल्ह्याला मोठे योगदान आहे असे स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या रंगभर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशे मनोगत प्रास्ताविकात सार्वजनिक स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संचालक शिवाजी विद्यालय अकोला मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड तथा गजानन महाराज विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुरणखेड गावचे भूषण स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या १८ व्या स्मृतिप्रीत्यर्थ  रंग भरो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन महाराज विद्यालयाचे माजी परवेक्षक डी.एम देशमुख प्रमुख उपस्थिती श्री चंडिका देवी संस्थान अध्यक्ष प्रशांत देशमुख , सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड संचालक मनोज देशमुख, गजानन महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रंणजित सोळंके, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे,  समाजीक कार्यकर्ते प्रशांत ठाकरे, पत्रकार योगेश विजयकर, शिवाजी विद्यालय अकोला शिक्षक प्रेमेद्र जंजाळ, निलेश देशमुख, व्हि.पी.देशमुख, खर्चे, अरविंद उगले, संतोष सुरवाडे, राऊत, प्रकाश उमाळे, सुनिल बोचरे, भिसे,प्रविण सोळंके, भगवान चिम, बढे, उपस्थित होते विद्यार्थ्यांना खाऊ वाटून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन महाराज विद्यालयाचे शिक्षक आदरणीय गिरीधर भोंडे, यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार योगेश विजयकर यांनी मांनले कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी रंगभर स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता

    Post Views:  232


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व