एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. यूनिटद्वारे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Aug 2023, 2:30 PM
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. युनिट द्वारे ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या मार्गदर्शनाने रॅलीचे आयोजन केले गेले. या रॅलीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने, आय क्यु. एस. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल, प्रा. डॉ. टी. जी. मिरगे, प्रा. डॉ. एम. सी. डाबरे, प्रा. डॉ. वंदना मिश्रा व एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे व एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी रॅलीला हिरवी झंडी दिली. डॉ. जी. जी. गोंडाणे यांनी कॅडेट्सला क्रांती दिनाचे महत्त्व सांगून देशाची असता अबाधित ठेवण्यासाठी जागृत केली. एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी एन. सी. सी. द्वारे आपल्या देशाचा विकास शांती समृद्धी व अखंडता कशाप्रकारे टिकविता येईल याबद्दल माहिती दिली. सर्व भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकतेची भावना कशी निर्माण झाली याविषयी मार्गदर्शन केले. क्रांती दिन रॅलीची सुरुवात महाविद्यालयातून होऊन रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक मार्गे जठारपेठ, राम नगर, सिव्हिल लाइन चौक मार्गे महाविद्यालयत समाप्त झाली. या रॅली दरम्यान कॅडेट्सनी "हम सब एक है, हम सब भारतीय है, भारत माता की जय" अश्या घोषणा देऊन आपल्यातील देशप्रेम जागृत करून उत्तेजित वातावरण निर्मिती केली. रॅली काढण्यामागचे औचित्य म्हणजे एन. सी. सी. कॅडेट्समध्ये देश प्रेम राष्ट्रीय एकतेची नवनिर्मिती करून देश स्वातंत्र्य करण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याला स्मरण करून त्याला उजाळा देणे हा होय. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शेख उमेर, हृतिक वानखडे, आकाश चव्हाण, रोहित दिघे, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट नैना टोंगळे, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट धनश्री चव्हान, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट हर्षा गायकवाड़, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट अरविंद कुमार यादव, कॅडेट चेतन जगताप, कैडेट स्वराज बोदाडे, कैडेट धनेश्री चव्हाण, कैडेट यश हरसुलकर, कैडेट गुणवंत गुर्जर, कैडेट लक्ष्मी सुले, कैडेट धनश्री दाने, कैडेट प्रणव इंगोले, कैडेट प्रणव वानखड़े, कैडेट सारिका यादव, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट सर्वेश धांडे, कॅडेट प्रणव वानखेड़े, कॅडेट आयुश अबरकर, कॅडेट प्रेम अहीर, कॅडेट रिषभ कोकाटे, कॅडेट आदित्य वाकोडे व इतर सर्व कॅडेट्सनी परिश्रम घेतले.
Post Views: 182