महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कार्यशाळेत प्रा विशाल कोरडे यांचे व्याख्यान संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 May 2023, 9:27 AM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे दिव्यांग शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर कार्य करीत आहेत . महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वाशिम व इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८ ते १३ मे २०२३  दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी disability inclusion facilitators training workshop चे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्रा.विशाल कोरडे यांनी दिव्यांग जनजागृती या विषयावर विशेष व्याख्यान प्रस्तुत केले . दिव्यांगांचे 21 प्रकार , दिव्यांग विषयक शास्त्रीय भाषा , ब्रेल प्रशिक्षण , रोजगार निर्मिती , दिव्यांग समस्या व उपाय योजना या विषयावर प्रा.कोरडे यांनी मार्गदर्शन केले . दि.28 मे २०२३ रोजी आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला येथे स्वर काव्य महोत्सव संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांच्या उपस्थितीत साजरा होणार असून संपूर्ण भारतातून दिव्यांग कवी आपली प्रस्तुती करणार असल्याचे प्रा. कोरडे यांनी सांगितले . या कार्यशाळेत युगांडा येथून आलेले आंतरराष्ट्रीय ट्रेनर एरिक यांच्यासोबतही प्रा विशाल कोरडे यांनी जागतिक स्तरावर दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल चर्चा केली . आयोजन समितीतर्फे प्रा.विशाल कोरडे यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन रचना सिंग यांनी केले . व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा समन्वय अधिकारी श्री.राजेश नागपुरे व महिला आर्थिक विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .

    Post Views:  231


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व