डॉक्टर दीपक मोरे यांना पितृशोक
अकोला - स्थानिक गोविंद हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर दीपक मोरे यांचे वडील तुळशीराम गोविंदराव मोरे यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षाचे होते. त्यांचे मागे एक मुलगा, एक मुलगी, व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा अंत्यविधी डॉ. मोरे यांचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कळंब गव्हाण येथे आज सायंकाळी पार पडला. डॉ. मोरे यांनी आपल्या वडिलांना अग्नी दिला. समाजातील बहुसंख्य गणमान्य नागरिक नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
Post Views: 23