प्रा. डॉ. संतोष हुशे यांना चैतन्यवृक्ष उपाधी बहाल


संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-02-28
   

अकोला : मुर्तिजापुर येथील संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गौरक्षण स्थळी संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तिजापुर च्या सत्कार आणि पदग्रहण सोहळ्यात प्रा.डॉ.संतोष हुशे चैतन्यवृक्ष उपाधी ने सम्मानित करण्यात आले.  
स्वामी विवेकानंद स्पोर्ट अँड अ‍ॅडव्हैंचर क्लब या संस्थेच्या  संदर्भात चर्चेविषयी भेटीत अ.भा.क्रांतीज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अँड.नंदेश आंबेडकर, अ‍ॅड.नरेंद्र बेलसरे  प्रा.संजय तडस, डॉ.अशोक गाडगे, स्तंभ लेखक राजेश एस. काटोले, कलाविष्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद इंगळे, आदींच्या उपस्थितीत अकोल्या जिल्ह्यातील युवकांसाठी चैतन्याची खाण आहात सर्व आपण या युवकांसाठी जणू चैतन्यवृक्ष च आहात कल्पवृक्षापरी   आपणास आजपासून  चैतन्ययृक्ष ही उपाधी  देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला प्रा.डॉ.श्रीकांत तिडके , संत गाडगेबाबा यांचे पणतू सतिष सोनोने यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य साहित्य निवड मंडळाचे सदस्य पुष्कराज गावंडे , माजी उपनगराध्यक्ष सुनिल पवार , समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव शेळके जेष्ठ आंबेडकरवादी नेते भाऊसाहेब खांडेकर , प्रा.सुधाकर गौरखेडे  आदींच्या उपस्थितीत  अत्यंत आदराने  ही उपाधी सम्मानपुर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक सचिव अनिल डाहेलकर, प्रा.राजकन्या कनखने  शेतकरी संघटनेचे अरविंद तायडे, प्रा वर्षा कावरे. अ.भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता इंगळे, तरुणाई फाउंडेशन चे संस्थापक संदिप देशमुख, कलाविष्कार चे अध्यक्ष मिलिंद इंगळे , अमोल कलोरे, सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेचे संतोष  इंगले,  नेहरु युवा मंडळाचे सचिव अनिल शुक्ला यांच्या सह साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  260


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व