लोकस्वातंत्र्यचे किशोर मुटे इंटरनॅशनल ह्युमन राईटस् अम्बासॅडरच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदावर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-09-05
वर्धा - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख व विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर मुटे यांची संघराज्य संलग्नित इंटरनॅशनल ह्यूमन राईटस् अम्बासॅडर असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे.
श्री. मुटे हे पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण समिती या राष्ट्रीय संघटनेचेही विदर्भ अध्यक्ष असून अ. भा. ग्राहक संरक्षण समितीचे वर्धा जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या उपक्रम आणि संघटन कार्यामध्ये त्यांचे प्रभावी योगदान आहे.
त्याचप्रमाणे सामाजिक, पत्रकारीता आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रातील तक्रारींचे निराकरण करून समाजाला न्याय तथा सुलभ सेवा मिळवून देण्यासाठी ते सतत संघर्षाने सक्रिय असतात. ते स्वतः शेतकरी असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमानाशी निगडीत समस्या निर्मुलनासाठी अधिकार्यांच्या भेटीगाठी आणि प्रसंगी आंदोलनाच्या मार्गाने जनतेचे हक्क अबाधित राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत.
त्यांना प्राप्त या नव्या सन्मानाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख व सर्व पदाधिकार्यांनी आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 196