अकोला - बाबासाहेब धाबेकर कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी सूतगिरणी अकोला साईट कारंजा (लाड) या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूकीत सुनिल के पाटील (धाकर) अध्यक्ष सुतगिरणी यांच्या नेतृत्वात प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व २१ संचालक बहूमतांनी विजयी झाले. या निवडणूकीमध्ये विरोधी गटाचे सहकार एकता पॅनलचा सुपडा साफ झाला. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या ९००० पेक्षा जास्त सभासद असलेल्या या संस्थेच्या निवडणूकीमध्ये सहकार एकता पॅनलच्या खोट्या व चूकिच्या प्रचाराला बळी न पडता मतदारांनी स्व.बाबासाहेब धाबेकरांनी लावलेल्या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर होण्यासाठी सुनिलभाऊ धाबेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडणूक दिले. कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघातून सुनिल के पाटील (धाबेकर), रोहन सु. पाटील, सुरेश दवंडे, अरुण ठोंबरे, पुरुषोत्तम ढोरे, तसेच ऑफिसर्स मतदार संघातून सुरेश महल्ले हे ६ उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. मत मोजणीत ग्रेडर मतदार संघातून विनोद देशमुख, मधुकर पाटील, अपेक्स मतदार संघातून श्रीकृष्ण दाणे, विश्वासराव देशमुख, विनायकराव बकाल, व हंगामी मतदार संघातून गुलाबराव कदम, नाना चहाटे, राजेश देशमुख, कमलकिशोर मिश्रा, इतर मागासवर्गीय मतदार संघातून गणेश माने, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून दिलीप हजारी, अनुसुचित जाती जमाती मतदार संघातून अरुण सरदार, महिला प्रतिनिधी मतदार संघातून सौ. स्नेहल कौसल, श्रीमती सीमा देशमुख, आदीवासी मतदार संघातून जगदेवराव लोखंडे यांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर मात करुन दणदणीत विजय प्राप्त केला. विनायकर कहाळेकर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक घेण्यात आली होती.
Post Views: 449
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay