कलियुगातील श्रावण बाळाने आजीला श्री स्वामी समर्थ शिवमहापुराण कथा खांद्यावर नेऊन ऐकवली


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  06 May 2023, 7:53 PM
   

(विजय बाहाकर) : पंडीत प्रदिपजी मिश्रा यांचे श्री स्वामी समर्थ महाशिवपूराण येण्यासाठी दोन नातवांनी भर उन्हात आपल्या आजीला उचलून मंडपात नेल्याचे दृश्य आज येथील गर्दीच्या रस्त्यावर पहायला मिळाले. आज पावणे अकराच्या दरम्यान एक नातू आपल्या आजीला कधी काखेत कधी खांद्यावर घेऊन भर उन्हात घेऊन जात होता. त्याला थांबवून त्या आजीला नाव विचारले असता वनमाला देशमुख शेगाव असे असे सांगितले. ज्या नातवाने खांद्यावर आजीला घेतले.त्यांचे नाव अनिकेत देशमुख व पृथ्वीराज देशमुख होते.आजही विदर्भात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. धन्य ती आजी , धन्य ते नातू...

         सिहोर प्रदीप जी मिश्रा यांच्या श्री स्वामी समर्थ शिव महापुराण कथा वाचनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातून सव्वा लाखाच्या वर भाविक महिला व पुरुषांनी मनोभावे कथा श्रवण केली एक लोटा जल सब समस्या का हल म्हणून या शिव महापुराण कथेच्या पं. प्रदीपजी मिश्रां कडे बघितले जाते.आजच्या कथेत तेल्हारा, अकोला, मेडशी आदी शहर व गावातील महिलांना आलेल्या अनुभवांची पञे पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी त्या महिलांना त्यांच्या जागेवरच उभे करून वाचून दाखवली.शिवपुराण कथा चालू असतांनाच काही किन्नर (तृतिय पंथी) स्टेजकडे येत असतांना त्यांना कर्तव्यावर असलेल्या पोलीस व कार्यकर्त्यांनी अडविले असता पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी कथा थांबवून त्यांना कथा व्यासपीठापर्यंत येण्याची परवानगी दिली. त्यांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून पंडित जी मिश्रा यांनी सन्मानित केले. पंडितजींनी किन्नर (तृतीयपंथी) यांची कशी निर्मिती झाली ती कथा भाविकांना ऐकवली. पुरुष व महिला भाविकांना दोन ते तीन किलोमीटर अंतर पैदल जाऊन भव्य मंडपात जावे लागत आहे. चार-पाच भव्य मंडप असूनही भाविकांना उन्हात उभे  राहावे लागत असल्याने मंडपाच्या कॉन्ट्रॅक्टरांना उद्याला जिथे जागा असेल त्या ठिकाणी मंडप वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे..चार मे पर्यंत हवा, पाणी, गारा पडल्या परंतु पाच तारखेपासून वरून राजाने भाविकांचा व आयोजकांचा हिरमोड केला नाही. हिंदू धर्मात अनेक संत, देव देवता , अनेक पंथ आहेत, पण भाविकांची श्रद्धा असलेल्या देवतेला तुम्ही काहीही मागितले तरी ते  देवाधिदेव महादेव यांची परवानगी घेऊनच तुमची इच्छा पुरी करतात असे पंडितजींनी आवर्जून सांगितले. शिवपुराण कथा ५ ते ११ तारखेपर्यंत आहे. आयोजन नियोजन चांगले असल्यामुळे भाविकांना कथेचा लाभ घेता येत आहे. कथेनंतर भाविकांसाठी आयोजकांनी सकाळपासून चहापाणी, अल्पोपहार, सकाळी व सायंकाळी भाविकांच्या भोजनाची वेगळे मंडप उभारून केली आहे . माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्तव्य तत्पर निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक उपस्थित आहे. प्रशासन सर्व परिस्थितीसाठी सुसज्ज असल्याचे दिसले. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफळे व वंदे मातरम शोध व बचाव पथकाचे उमेश आटोटे व त्यांची टीम बचाव साहित्य सह उपस्थित आहेत. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने अकोला पातुर मार्ग वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी व्यवस्था केली आहे.

    Post Views:  645


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व