संदीप देशमुख स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव अवार्ड 25 ने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Sep 2025, 3:55 PM
   

अकोला : अकोला येथील सामाजिक साहित्यिक पत्रकार श्री संदीप देशमुख यांना नुकताच वेलनेस फाउंडेशन दिल्लीच्या वतीने दिला जाणारा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव अवार्ड  2025 ने  नुकतेच मान्यवरांच्या शुभहस्ते  सन्मानित करण्यात आले. तरुणाई फाउंडेशनच्या माध्यमातून  नवो दित साहित्य कलावंतांना हक्काचे विचारपीठ मिळून देण्याच काम  गेल्या दहा वर्षापासून श्री संदीप देशमुख हे करीत आहेत आरोग्य संगीत. सामाजिक कला व्यसनमुक्ती साहित्य  आदी क्षेत्रात  कार्यक्रमाचे  यशस्वी आयोजन सुरू असते  . तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून संदीप देशमुख यांनी सात अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन आयोजित करून अकोल्याच्या इतिहासात साहित्यिक क्षेत्राची उंची वाढवली आहे  हे  हे विशेष. श्री संदीप देशमुख यांना आजपर्यंत विविध सामाजिक संघटनांनी सन्मानित केले असून  तीस च्या वर राज्यतरीय पुरस्कार त्यांना  मिळालेले आहेत.  शुभम मराठी साहित्य मंडळ  भावगंध साहित्य संघ  आदि अकोल्यातील नामांकित साहित्य संघटनेच्या सचिव पदी ते कार्यरत आहेत. अकोला जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा साहित्य संमेलन घेण्याचा मान तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप देशमुख यांना जातो हे विशेष.

    Post Views:  88


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted