एल.आर.टी. च्या एन.सी.सी. युनिटचा पुढाकार
76 व्या एन.सी.सी. दिनानिमित्त कॅडेट्सनी राबविले मोर्णा नदी स्वच्छता अभियान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Nov 2024, 11:25 AM
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोल्याच्या एन.सी.सी. युनिटतर्फे मोर्णा स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. 11 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय शुक्ला तसेच एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोल्याचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या मार्गर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती एल.आर.टी. कॉलेजचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी एन.सी.सी. आपला स्थापना दिवस राबवितो. यावर्षी नॅशनल कॅडेट कॉर्प्स आपला 76 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1948 मध्ये स्थापन झालेली एन.सी.सी. ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे. या दिवसाचे औचित्य साधून एल.आर.टी. च्या एन.सी.सी. युनिट तर्फे रविवारी 24 नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील मोर्णा नदीची स्वच्छता या मोहीमे अंतर्गत नदीतील कचरा प्लास्टिक काढून नदीचा काट स्वच्छ केला. नद्यांच्या काठावर कचरा टाकू नका, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा, नद्यांच्या काठावर झाडे लावा, जनावरांना नदीत जाण्यापासून रोखा, शहरांचे अस्वच्छ पाणी नद्यांमध्ये जाऊ देऊ नका अश्या घोषणा देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीनियर अंडर ऑफिसर स्वराज बोदडे, जूनियर अंडर ऑफिसर यशवंत हरसुलकर, सार्जंट त्रिशब कोकाटे, कॉर्पोरल प्रेम अहिर, कॉर्पोरल शुभम दुबे, कॅडेट नयन घुगे, कॅडेट प्रवीन सोलंकी, कॅडेट हर्ष देवगीकर, कॅडेट क्रिश करावड़िया, कॅडेट आदित्य ताले, कॅडेट निखिल मौर्य, कॅडेट पियुष धांडे, कॅडेट वैभव काळपांडे, कॅडेट आयुष कुलकर्णी, कॅडेट स्वानंद चौधरी व इतर कॅडेट्सनी पुढाकार घेतला.
Post Views: 5