महावितरणने दिला गुपचूप शॉक, बिलामागे दहा रुपये दरवाढ, मनपा क्षेत्रात स्थिर आकार वाढवला
महावितरणने गुपचूप सर्व महानगर पालिका क्षेत्रात वीज महाग केली आहे. घरगुती ग्राहकांना आता जे बिल येत आ
महावितरणने दिला गुपचूप शॉक, बिलामागे दहा रुपये दरवाढ, मनपा क्षेत्रात स्थिर आकार वाढवला
नागपूर : महावितरणने गुपचूप सर्व महानगर पालिका क्षेत्रात वीज महाग केली आहे. घरगुती ग्राहकांना आता जे बिल येत आहे, त्यात १० रुपयांचा स्थिर आकार (फिक्स्ड चार्ज) अतिरिक्त वसुली सुरू झाली आहे. ही वसुली केव्हापर्यंत चालेल, हेही कंपनीने सांगितलेले नाही. मात्र, एप्रिल २०२२ पासून यात पुन्हा वाढ केली जाईल, हे स्पष्ट केले आहे.
महावितरणने विजेच्या दरात थेट वाढ न करता अन्य स्रोतांद्वारे ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याची रणनीती आखली आहे. कंपनीला प्रदेश नियामक आयोगाकडूनही हिरवा कंदील मिळत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये घरगुती ग्राहकांच्या सिंगल फेज कनेक्शनमध्ये दोन रुपये, थ्री फेज कनेक्शनवर प्रति किलोवॅट ५ रुपये वाढविण्यात आले होते. एप्रिल २०२२ मध्ये या दरांमध्ये पुन्हा वाढ प्रस्तावित आहे. दरम्यान, महावितरणने नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, चंद्रपूरसह राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांत प्रति कनेक्शन १० रुपये अतिरिक्त शुल्क वसूल करणे सुरू केले आहे. एप्रिल २०२१ मध्येच मंजुरीमहावितरणने स्पष्ट केले आहे की, नियामक आयोगाने एप्रिल २०२१ मध्येच या दरवाढीला मंजुरी दिली होती. परंतु, नागरी क्षेत्र निश्चित करण्यास विलंब झाला. बऱ्याच चर्चेनंतर आता नोव्हेंबरपासून मनपा क्षेत्रात ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post Views: 220