अधिकारी हे फक्त करियरसाठीच नव्हे तर लोकसेवेची संधी म्हणून प्रशासकीय सेवेत येत असतात.
ठाणेदार विलास पाटील यांनी भेटीत व्यक्त केला सामाजिक दृष्टीकोन..!
24 Jun 2023, 10:23 PM
शेगाव : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा दै.युवा मराठा चे ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यांनी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांची भेट घेऊन कायदेशीर कर्तव्ये आणि त्यासोबतच पोलिस विभागाची सामाजिक बांधिलकी या विषयावर चर्चा केली.यावेळी ठाणेदार पाटील यांनी त्यांच्या मागील कारकिर्दीत कायदेशीर आणि सामाजिक कर्तव्याची सांगड घालत पार पाडाव्या लागलेल्या काही प्रसंगांना उजाळा दिला.
मनमोकळ्यापणाने झालेल्या या चर्चेमध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये रूजू होतांना अधिकाऱ्यांचा फक्त करिअर एवढाच मुख्य उद्देश नसतो तर त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवेची मिळणारी संधी हे सुदा त्यांचेही एक आनंदी जीवन असते. समाजाचे प्रश्न सोडवून लोकांना अनेक ठिकाणी न्याय देऊन संरक्षण पुरविता येते. ही एक मोठी लोकसेवेची त्यांना प्राप्त झालेली संधी असते.हे ध्येय नजरेसमोर ठेऊनच अनेक अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा संकल्प करीत असतात.
विलास पाटील हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शेगाव पोलीस स्टेशनला लाभले. त्यांच्याकडे शेगाव तालुक्याचे चित्र बदलण्याची ताकद आहे. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांनी मागील कारकिर्दीतून सिध्द केलेला परिचय आहे.अशा कर्तव्यवेक्षक अधिकाऱ्यांची संतनगरी शेगावच्या पोलीस स्टेशनला खरी गरज होती.त्यांच्यापर्यंत कसलीही तक्रार घेऊन आलेला व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळावे, त्याचा अपेक्षाभंग शक्यतोवर होऊ अनेक हा कटाक्ष पाळणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा बोलक्या प्रतिक्रिया जनतेमधून त्यांच्याबाबतित आहेत.हिच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
कोणत्याही बातमीला अल्पावधीत प्रतिसाद देणारे, कसल्याही गुन्ह्याचा गुंता लिलया सोडवून त्याचा छडा लावणे, यामुळे अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.अशा या हरहुन्नरी, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम. ठाणेदार विलास पाटील या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा असाच रंजल्या गांजलेल्यांना न्याय देणारा राहो. हेच या निमित्ताने अपेक्षा व सदिच्छा. आपली दिवसेंदिवस बढती होत राहो या सदिच्छासह शुभेच्छा...!
Post Views: 213