हरवलो मी या गझल अल्बम सॉंग चा प्रीमियर सोहळा उत्साहात संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
21 Apr 2023, 3:31 PM
अकोला : स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे कार्यरत सहयोगी प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य प्रा.हर्षवर्धन मानकर यांनी संगीतबद्ध केलेली व गायलेली तसेच डॉ.अनिल सूर्या यांनी लिहिलेली मराठी गझल हरवलो मी या गझलचा प्रीमियर सोहळा दि.२० एप्रिल २०२३ रोजी पार पडला. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीत विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, गझलकार अमोल शिरसाट , विठू माऊली फिल्म क्रिएशन मेहकर चे विजय फंगाळ संगीतकार व गायक प्रा.हर्षवर्धन मानकर तसेच नायक जगदीश वाळोकार व नाईका पूनम शेळके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच रागिनी स्टुडिओचे प्रमोद ताजने, विश्वास साठे सहकलाकार सिद्धार्थ जाधव, प्रज्वल नवघरे, आनंद चोपडे, अमोल सावरगावकर, संगीता सायरे व प्रकाश दुबे उपस्थित होते. दि.22 एप्रिल २०२३ ला सदर गझल यूट्यूब च्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीस येत असून जास्तीत जास्त रसिकापर्यंत पोहोचवावी असे आवाहन संगीतकार व गायक प्रा.हर्षवर्धन मानकर व दिग्दर्शक विजय फंगाळ यांनी केले . अध्यक्षीय भाषणात डॉ.किशोर देशमुख यांनी प्रा.हर्षवर्धन मानकर यांच्या संगीत प्रतिभेचए कौतुक केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत विभागातील सर्व प्राध्यापक रुंद व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सदस्यांनी सहकार्य केले .
Post Views: 147