मनुष्याने दैनंदिन जीवनात संविधानाचा अवलंब करावा डॉ.गोविंद कामटे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Nov 2024, 11:28 AM
परभणी - आज बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र मुख्य शाखा तलाठी कार्यालयच्या बाजूला वसमत रोड प्रभाग क्रमांक 15 परभणी येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेसात वाजता अभिवादन व 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व स्वर्गीय मुंबई पोलीस ॲडिशनल कमिशनर अशोक कामटे यांना श्रद्धांजली आयोजित करण्यात आली राष्ट्रजन फाउंडेशन परभणी - शिवमुद्रा संघटना परभणीच्या वतीने भारतीय संविधान दिन व शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली निमित्ताने संविधानाचे अभिवादन व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे,शिवमुद्रा संघटनेचे अध्यक्ष अँड.सूर्यकांत मोगल पाटील, बालकलाकार रुद्राक्ष आवटे,संविधान दिन महोत्सव आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे,याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे प्रस्ताविक मध्ये बोलताना व्यक्त केले डॉ.गोविंद कामटे यांनी भाषण करताना भारतीय संविधान हे सर्वांनी वाचन केलं पाहिजे व त्याचा प्रत्येकाने उत्सव साजरा केला पाहिजे संविधान ही अति महत्त्वाची गोष्ट आहे,हे समजून सर्वांनी अमलात आणलं पाहिजे मत व्यक्त केले अँड सूर्यकांत मोगल यांनी संविधान हे सर्व लहान बालक लहान-मोठ्यांनी सर्व घटकापर्यंत त्याचे दैनंदिन जीवनामध्ये आचरण करायला पाहिजे म्हणून संविधान हे सर्वश्रेष्ठ समजून संविधानचे मूल्य सर्वांनी जपले पाहिजे अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.
Post Views: 9