जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव करणार; डॉ. जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन


 विश्वप्रभात  04 Sep 2024, 8:13 PM
   

अकोला : गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विधायक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जिल्हा स्तरावर तीन आणि तालुका स्तरावर प्रत्येकी एक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रशासनाकडून गौरविण्यात येणार आहे. त्याबाबत निवड समिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली.
 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशासन, लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांचे अध्यक्ष यांच्या सभेत याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्णय जारी केला. जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री हे समितीचे सदस्य सचिव असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस उपअधिक्षक (गृह) व ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आदी सदस्य आहेत. निवड प्रक्रियेची रूपरेषा समितीकडून जाहीर केली जाईल. मंडळ धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत किंवा पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था परवानगी प्राप्त असणे आवश्यक आहे.

    Post Views:  88


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व