नियोजित नाट्यगृहास निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे - सुनील इंगळे


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 May 2023, 5:23 PM
   

अंबरनाथ : साऱ्या विश्वाला आपल्या काव्याने भारावून टाकणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा काव्यरूपी ठेवा अनमोल आहे आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या प्रतिभा रुपी साहित्याला अनमोल सोन्याच्या मोहरायांचा हंडा म्हटले आहे अरे संसार संसार पासून ते जगणं न मरण एका श्वासाचं अंतर या व अशा हजारो ओवींनी बहिणाबाईंनी जगाला तत्त्वज्ञान शिकविले आपल्या सहज व सोप्या काव्याने अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली अशा  खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांची सरकार दरबारी मात्र सतत उपेक्षाच होत आलेली आहे त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापासून ते त्यांच्या काव्याची साहित्याची शासनातर्फे नेहमी अनास्थाच दिसून आली आहे बहिणाबाईंची कर्मभूमी सोडता महाराष्ट्रात इतर कुठेही दखल न घेता त्यांचे स्मारक अथवा एखाद्या नाट्यगृहाला नावही दिसून येत नाही अंबरनाथ नगर परिषदेच्या पूर्णावस्थेत येणाऱ्या नाट्यगृहास निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत अंबरनाथ मधील सुजाण नागरिक नाट्य रसिक या आमच्या मागणीला नक्कीच पाठिंबा देतील तरी आपण या संदर्भात आमच्या मागणीला आपल्या ठरावात रूपांतर करून हजारो बहिणाई रसिकांची मागणी पूर्ण कराल या अपेक्षेमध्ये अशी मागणी बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील इंगळे यांनी केली आहे. एकंदरीत असे आहे की ठिकठिकाणी ठराविक तीच तीच नावे जाहीर केली जातात तीच तीच परत रिपीट होतात परंतु भावी पिढीला  ज्ञात होणारी नावे आज लुप्त झाली आहेत राजकारणी फक्त राजकारण करत असतात ही खंत त्यांनी व्यक्त केली.

    Post Views:  200


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व