पुणें : समूह संस्थापक नानाजी रामटेके,कल्पना टेंभुर्णीकर ( नागपूर ,)यांच्या साहित्य दर्पण कला मंच नागपूर तर्फे नुकत्याच तथागताची वाणी या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पुण्यातील काकडेदेशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या काव्याला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले , या निमित्ताने प्रा.काकडे यांचा काकडेदेशमुख शिक्षण संस्थेतर्फे महात्मा फुले गौरव ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी प्राचार्य अनुश्री खोपडे माधवी देशमाने अजित घाडगे उपस्थित होते.
Post Views: 384