अकोला नॅब च्या अंध क्रिकेट टीम चा विक्रम


राज्यस्तरीय स्पर्धेत पटकाविला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Sep 2023, 7:35 PM
   

अकोला : ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत अकोल्याच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात NAB च्या टीमने महाराष्ट्रात बाजी मारून प्रथम क्रमांक पटकाविला आहे या विजयाबद्दल अकोला संघास शानदार ट्रॉफी व पुरस्कार रुपी रक्कम प्रदान करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल च्या वतीने अंध खेळाडूंची ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोंकण, पुणे आदी विभागातील ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
अकोल्याच्या संघात संघाचे कर्णधार शंकर अगमकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघात अनिकेत काटोले  अक्षय कोकणे, प्रशांत पाखरे, एकनाथ किनवटकर, सुमित गोपनारायण, श्याम पवार, उमेश जाधव, नितेश भोजने, अमर कांबळे, मनोज पडोळे या सदर खेळाडूंचा समावेश होता या सर्व खेळाडूंची आपल्या संघाचे शानदार प्रदर्शन करून सर्व संघांना पराभूत केले या विजयाबद्दल कर्णधार शंकर अगमकर याचा अकोला NAB च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला याप्रसंगी NAB चे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, उपाध्यक्ष राम शेगोकार उपाध्यक्ष डॉक्टर नितीन उपाध्ये, सचिव नितीन गवळी, सदस्य विजय सारभुकन, अविनाश पाटील, रोटरी क्लब अकोल्याचे पदाधिकारी ओंकार गांगडे, विजय जानी, मयूर सिंघानिया पंचल चौधरी, NAB विकास अधिकारी विनोद शेगोकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते अकोला NAB चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, आमदार रणधीर सावरकर सहसचिव जयंत मसने, डॉक्टर श्रीराम लाहोळे, अड अरुण सौदागर,अड मंजुषा ढवळे, अन्नपूर्णा गावंडे, वासुदेव चंदिवले यांनी या विजेता टीमचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Post Views:  80


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व