पेन्शनर टीचर्स फोरमने मुख्यमंत्रांचे स्वाधिन केला; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाखाचा चेक
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Dec 2025, 10:04 AM
अकोला : हिवरखेड ता. तेल्हारा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांची विजय संकल्प सभा संपन्न झाली. या सभेमध्ये आमदार रणधिर सावरकर यांचे उपस्थितीत पेन्शनर टीचर्स फोरम, जिल्हा अकोला या सेवानिवृत्त शिक्षकांच्या संघटनेने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांचे स्वाधिन केला.
पेन्शनर टीचर्स फोरम, जिल्हा अकोला ही सेवानिवृत्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संघटना असून अध्यापन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हाताऱ्या वयातही संघटनेचे पदाधिकारी, सभासद यांनी अतिवृष्टीग्रस शेतकरी बंधुभगिनींसाठी जिल्हाभरातून तब्बल एक लाख रुपये गोळा करून आपल्यातील संवेदनशीलतेचा, सामाजिक उत्तरदायित्वाचा व आपण भूमिपुत्र तथा शेतकरी असल्याचा प्रत्यय आणून दिला. याप्रकरणी विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी शिक्षकांचेही अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी आपल्या निवृत्ती वेतनातून त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पर्यायाने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांस मदतीचा हात दिला.
सदर कार्यक्रमास पेन्शनर टीचर्स फोरमचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष जयंत घाटोळ, उपाध्यक्ष ज्ञानदेव शेगोकार, प्रभारी सचिव विलास नन्नावरे, मुख्य सचिव सतीश दोडके, सहसंघटक रमेश काळे, अकोला तालुकाध्यक्ष मुरलीधर कुलट, प्रल्हाद डामरे, तेल्हारा तालुकाध्यक्ष गोपाल भुजबले,भारत तायडे, नागोराव खारोडे, एकनाथ बहाकार, मनोहर शेळके,मो.इसाक, दिलीप भोपळे, शिवलाल फोकमारे, रामेश्वर भोंगाळे, अविनाश मोहिते, गजानन वाघमारे, प्रभूती उपस्थित होते. सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हाध्यक्ष जयंत घाटोळ व प्रभारी सचिव विलास नन्नावरे यांनी व्यासपीठावर जाऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचे उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना चेक प्रदान केला. सेवानिवृत्त शिक्षकांनी संकटग्रस्त शेतकरी बांधवांप्रती दर्शविलेल्या संवेदनशीलतेबद्दल सर्व शिक्षक बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भावी काळात पेन्शनर टीचर्स फोरमद्वारे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा अजून उन्नत करणेकरिता निश्चित फलदायी उपक्रम राबविण्यात येतील असे जिल्हाध्यक्ष जयंत घाटोळ यांनी सांगितले.
Post Views: 16