वानखेड येथे भीम जयंती आणि फुले जयंती एकत्रपणे साजरी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Apr 2023, 8:18 AM
   

(स्वप्निल देशमुख) वानखेड :  येथील बौद्ध बांधवांनी फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर आधारित स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रपणे साजरी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे महात्मा  ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी गुरु मानले आहे तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले होते वानखेड येथील बौद्ध  बांधवांनी गुरु शिष्याची जयंती मोठ्या उत्साहात  साजरी केली या मिरवणूक उत्सवाच्या अगोदरच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून महामानवाना आदरांजली वाहण्यात आली. जयंती उत्सव मिरवणुकी  मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे तैलचित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्र एकच करून गुरु शिष्य जयंती उत्साहाने साजरी केली   सर्व गावभर दोन्ही महामानवांच्या तैल चित्राची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत समोर स्थापित असलेले शिवाजी महाराज पुतळा येथे मिरवणूक थांबून मेजर मिलिंद सोनाजी इंगळे  यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधी पूजन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शेकडो महिलांनी व पुरुषांनी  छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून त्यांच्या नावाचा जल्लोष केला या गुरु शिष्याच्या जयंती चे एकमेव वैशिष्ट्य असे होते की या  उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.कार्यक्रमाची संकल्पना ग्रामपंचायत सदस्य दीपक सारंगधर इंगळे,  भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश डीगाम्बर इंगळे, सतीश गणेश टोपरे, अश्विन भारसाकळे, सुमेध रायपुरे,अजय पंजाब तायडे, सावित्री बाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा कविताताई इंगळे  व सर्व बौद्ध  बांधव मंडळी व महिला मंडळाने मांडली.हा गुरु शिष्य जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय मिलिंद क्रीडा मंडळाचे सहकार्य लाभले.

    Post Views:  148


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व