देशमुख समाज व जागृती मंडळाकडून पंजाबराव देशमुख जयंती साजरी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-12-31
   

अकोला : हरित क्रांतीचे प्रणेते, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची  जयंती अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळ व देशमुख जागृती मंडळाकडून साजरी करण्यात आली.  स्थानिक रोकडे मंगल कार्यालयाच्या समोरील कलश अपार्टमेंटमध्ये शाश्वत अकोला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात दि. २७ डिसेंबर रोजी भाऊसाहेबांच्या फोटोला हारार्पण करून त्यांना वंदन करण्यात आले.

याप्रसंगी अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय देशमुख निंबेकर, उपाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. के.व्ही. देशमुख डोंगरगावकर, अकोला फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री विश्वासराव देशमुख, जागृती मंडळ सचिव नितीन देशमुख, राजाभाऊ देशमुख,कवठळकर, यांनी भाऊसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव केला. या कार्यक्रमाला देशमुख जागृती मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय कृष्णराव देशमुख कंझारेकर, देशमुख समाज मंडळाचे कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव अश्विन देशमुख, व्हि.डब्ल्यू. देशमुख, यशवंत देशमुख, विजय देशमुख, राजाभाऊ देशमुख, रिधोरेकर, सुजय देशमुख, दिलीप देशमुख,डि.आर.देशमुख, अंकुश देशमुख, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, मुकेश देशमुख, अभिषेक देशमुख, प्रविण देशमुख, प्रशांत देशमुख इतर सभासद उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे संचालन यशवंत देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन संजय देशमुख निंबेकर यांनी केले.

    Post Views:  237


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व