मैनाबाई ढोणे विद्यालयात पर्यावरण पुरक होळी उत्सव साजरा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Mar 2022, 8:06 PM
   

तेल्हारा : आडसूळ येथिल मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात पर्यावरण पुरक होळी उत्सव साजरा करण्यात आला.या वेळी  शाळेच्या परिसर स्वच्छ करण्यात आला.  केरकचरा जमा करण्यात आला. व त्याची होळी पेटविण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्यातील वाईट गुण एका कागदावर लिहून ते कागद होळीत टाकण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे चांगले गुण इतर मुलांनी सुदर्शन पत्रिकेवर लिहून त्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. 
होलिका उत्सवाला सकारात्मकेची जोड देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने होळी साजरी करण्यात आली. या नेत्रदीपक उत्सवामध्ये मुख्याध्यापक अरविंद गिर्हे, शिवराजे जामोदे कविराज, अरुण काळे, सौ सुनिता गिर्हे, गणेश नागळे, पुरूषोत्तम इंगोले, विठ्ठलराव महाले, नंदकिशोर महाले यांनी सक्रिय सहभाग घेतला. याच वेळी नैसर्गिक रंगाची रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले.

    Post Views:  466


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख