बोईसरमध्ये \'नवरंग फाउंडेशन\'तर्फे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन; पत्रकार परिषदेत दिली माहिती


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2026, 10:23 AM
   

पालघर जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र मेश्राम.....
नवरंग फाउंडेशन (बोईसर) यांच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या गरबा महोत्सवासंदर्भात आज एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना संयोजकांनी सांगितले की, हा महोत्सव कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, सर्व पक्षांमधील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन गरबाप्रेमींसाठी हे सुरक्षित व भव्य व्यासपीठ निर्माण करत आहेत. सर्वपक्षीय ऐक्याच्या माध्यमातून बोईसर परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाचा सांस्कृतिक उत्सव उपलब्ध करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षा आणि पार्किंग व्यवस्था:
या महोत्सवात महिला व युवतींची उपस्थिती लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून कोणालाही कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. तसेच, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येणाऱ्या वाहनांकरिता प्रशस्त आणि सुरक्षित पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
खर्चाचा पारदर्शक हिशोब:
हा कार्यक्रम कोणत्याही नफ्याच्या उद्देशाने न करता केवळ सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण आयोजनात झालेल्या खर्चाचा एक-एक रुपयाचा हिशोब अत्यंत पारदर्शकपणे जाहीर केला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
नवरंग फाउंडेशनची कार्यकारिणी समिती:
या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत  प्रभाकर राऊत (विश्वस्त), निलम सांखे (अध्यक्ष), संजय पाटील (कार्याध्यक्ष), अशोक वडे (कार्यकारी सचिव), सचिन लोखंडे (उपाध्यक्ष), समिर मोरे (उपाध्यक्ष), मनोज अधिकारी (उपाध्यक्ष), अल्पेश मोरे (खजिनदार), चंद्रकांत जाधव (सचिव), अतुल देसाई (सभासद/सदस्य), देवेश देशमुख (सह खजिनदार), प्रशांत राऊत,  दिनेश वडे, शुभम वडे, राम नायकुडे, आशिष ठाकूर, आशिष संखे , गणेश संखे आणि सुनिकेत पाटील यांचा समावेश आहे.
बोईसर आणि पालघर परिसरातील सर्व गरबाप्रेमी नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन नवरंग फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व