७ वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Apr 2023, 2:58 PM
   

महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेतील  इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे, आरुणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका अक्षदा कुलकर्णी कार्यक्रमास उपस्थित होत्या.

         दीप-प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली .  प्रास्ताविक कल्पना वानखेडे यांनी  करून विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देवून अतिथींचे स्वागत केले.  सार्थक, प्रतीक्षा, अनुष्का, यश, समीक्षा या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मध्ये पहिली पासून सातवी पर्यंतच्या  आपल्या आठवणींना उजाळा दिला. तर श्रावणी व संभाजी या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी संमिश्र भावना कवितामधून व्यक्त केल्या. समीक्षा थोरात या विद्यार्थिनींने  एका वर्षात शाळेची झालेली गट्टी  अतिशय सुंदर शब्दात वर्णन केली. अनुपमा रासकर , सुवर्णा घोरपडे, मनीषा वैद्य यांनी विद्यार्थ्यांविषयी काही सुखद तर काही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी विष्णू मोरे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला व  विद्यार्थ्यांचे  भरभरून  कौतुक केले. आयुष्यात  कधीही हार  न मानता सतत प्रयत्नशिल राहा....एक दिवस आपल्यासाठी नक्कीच चांगला उगवेल. अशा शब्दात त्यांनी मुलांशी संवाद साधून   विद्यापीठ हायस्कूल विषयी सविस्तर माहिती मुलांना दिली.   सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ललिता सातव यांनी  केले. याप्रसंगी सातवीचे सर्व विद्यार्थी, शिक्षिका शोभा अंबुरे, सुनीता  वांजळे, वैशाली सैंधाणे उपस्थित होत्या.

    Post Views:  483


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व