भारतातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून १० हजार रुपये पेन्शन सन्मान धन पेन्शन म्हणून मिळावे


अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर मेळाव्यात मागणी ....अर्थक्रांती तज्ञ अनिल बोकील
 vishwaprabhat  02 Dec 2023, 6:30 PM
   

(विजय बाहकर) अकोला : प्रत्येक नागरिकाने वयाच्या साठ वर्षांपर्यंत टॅक्स भरणे ही त्यांची खरी देशसेवा असते. म्हणून प्रत्येक नागरिकाला सरकारने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून त्याची आयुष्याची संध्याकाळ चांगली जाऊन त्याला सन्मानाने जगता यावे सन्मान धन पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे असे जाणीवपूर्वक प्रतिपादन अर्थक्रांती तज्ञ श्री अनिल बोकील यांनी केले.
        अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतातर्फे सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनपर भाषणातून ते बोलत होते. नागपूर येथे अहिल्यादेवी मंदिर सभाग‌हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 कार्यक्रमाचे उद्घाटन  माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा , ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा, अर्थतज्ञ अनिल बोकील, संघटन मंत्री दिनकर सबनीस, जयंती भाई कथरिया, प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे, नितीन काकडे, डॉक्टर अजय गाडे, गजानन पांडे आदी मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून केले.  कार्यक्रमाची सुरुवात केली. सन्माननीय नारायण भाई शाह, डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा आदी मान्यवरांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महत्त्व, ग्राहक पंचायतीने केलेले कार्य, आणि पुढील वाटचाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सामान्य ग्राहक ,विजयी ग्राहक यही हमारा लक्ष रहेगा असे प्रांत अध्यक्ष नारायण मेहेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
१९७४ साली लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि त्याची फळे सामान्य ग्राहक चाखत आहे.
      आज इतर उत्पादनासोबत विशेषतः मेडिसिन उत्पादन क्षेत्रात एम.आर.पी.अनेक पटीने लिहून ग्राहकांची फसवणूक होते. ती थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच ग्रामीण भागात चळवळ बळकट व्हावी, तिचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वक्त्यांनी  सांगितले. द्वितीय सत्रात अर्थक्रांती तज्ञ श्री अनिल  बोकील यांनी आपल्या व्याख्यानात प्रत्येक नागरिक ,मग तो शेतकरी असेल नोकरदार असेल, भांडवलदार असेल, नाहीतर भिकारी सुद्धा पाच रुपयाचा बिस्कीट चा पुडा विकत घेत असताना त्यावर लावलेल्या टॅक्स, जीएसटी भरतो तसेच प्रत्येक जीवनावश्यक वस्तू, इतर प्रत्येक बाबी विकत घेतांना प्रत्येक वयाच्या ६० वर्षापर्यत नियमितपणे टॅक्स भरतो गाय म्हैस दुफती असली म्हणजे म्हणजे तिला ढेप, सरकी खाऊ घातल्या जाते. भाकड झाल्यावर....
   त्याप्रमाणे सासू सासरे म्हातारे झाल्यावर त्यांची परवड  होऊ नये म्हणून त्यामुळे  मूल -सुना आई वडील, सासू-सासर्‍यांना तुम्ही आमच्यात रहा म्हणून भांडतील. असे आवर्जून अर्थतज्ञ श्री अनिल. बोकील साहेब म्हणाले
     श्री अनिल बोकील यांनी पंतप्रधानांच्या डोक्यात नोटबंदीची कल्पना रुजवली. आजही  त्यांचा पन्नास रुपयांच्या वर ची नोट नको असा आग्रह आहे. हेच नाही तर सरकारने सर्व प्रकारचे टॅक्स रद्द करून २ टक्के बँक ट्रांजेक्शन टॅक्स लावण्यात यावा. इन्कम टॅक्स ,जीएसटी, सर्विस टॅक्स, इतर कोणत्याच प्रकारचे टॅक्स घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही फक्त दोन टक्के टॅक्स मधून केंद्र ,राज्य ,स्थानिक संस्था आदींनी आप आपला हिस्सा घेतल्यावर सरकार चालवता येते. त्यांचा फार्मूला तयार आहे पण तो सरकारने त्यावर अजून पर्यंत कुठल्याही कार्यवाही केली नाही.यावर अनेक मतमतांतरे आहेत.
      भारत देश वैविध्यपूर्ण देश असल्याने टुरिझम ला भरपूर वाव आहे. असेही ते म्हणाले. स्वर्ण जयंती वर्षा निमित्त विदर्भातील अकराही जिल्ह्यातील पाचशेच्या वर पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य हजर होते. अकोला जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष दिनेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली श्री मेहरे,श्री बाळापूरे , श्री साधू विजय बाहाकर  सह पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य हजर होते. डॉक्टर नारायण गो. मेहरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्वश्री नितीन काकडे, डॉक्टर अजय गाडे, गजानन पांडे आदी  पदाधिकारी व कार्यकारिणीने चहा ,नाश्ता सुरुची भोजना सह कामाचे उत्कृष्ट नियोजनामुळे  शिस्तबद्ध असा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा स्वर्ण जयंती महोत्सव पार पडला.असे विजय बाहाकर कळवितात.

    Post Views:  296


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व