न्यु तापडिया नगर-खरप रस्त्याकरिता वंचितने दिले प्रशासनाला निवेदन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Oct 2022, 12:54 PM
अकोला : न्यु तापडिया नगर-खरप रस्त्याकरिता वंचितने दिले प्रशासनाला निवेदन प्रभाग क्र. 4 मधील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट ते खरप पाचपिंपळ हा रस्ता तयार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व च्या वतीने अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. हद्दवाढ झाल्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या या परिसरातील 22 गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे न्यू तापडिया नगर ते खरप फाटा या रस्त्याची चाळण झाली असून वाहनधारकांना व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात घडून शारीरिक हानी पोहचत आहे. वेळोवेळी या रस्ताच्या दुरुस्ती व नवीन रस्ता बनविण्यासबंधी महापालिका व जिल्हा परिषदेला निवेदन दिले असता सदर रस्ता आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याबाबत सांगण्यात येते त्यामुळे या रस्त्याबाबत प्रशासकीय पेच निर्माण होऊन विकास रखडला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणारे विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी म.ग्रा.रो.ह.योजना किंवा जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून न्यू तापडिया नगर-खरप-पाचपिंपळ म.ग्रा.र.क्र.120 रस्ता बांधकाम किंवा दुरुस्ती करिता निधी मजूर करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष तथा जि. प.सदस्य शँकरराव इंगळे, महानगर महासचिव मनोहर बनसोड, माणिक शेळके, सचिन गोरले, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद बनसोड, आनंद इंगळे, गुलाबराव इंगळे, दिलीप सिरसाट, दिगंबर वाकोडे, प्रल्हाद इंगळे, महानगर प्रसिद्धी प्रमुख पुरुषोत्तम वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 148