मार्गशीर्ष महिन्यातील शेवट गुरुवारी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी


 संजय देशमुख  31 Dec 2021, 7:16 PM
   

अरुण भटकर
शेगाव : विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या संत नगरी शेगाव शहरात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि एकादशी या संयोगामुळे दर्शनाकरिता भाविकांनी श्रींच्या मंदिरात गर्दी केली होती. भारतीय संस्कृती मध्ये मार्गशीर्ष महिना आला धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त आहे. मार्गशीर्ष महिन्यातील आजचा गुरुवार हा शेवटचा गुरुवार व त्यास गुरुवारी एकादशी तिथी आल्याने भाविकांनी सकाळपासूनच श्रींच्या मंदिरात गर्दी करणे सुरू केले होते शेकडो भाविक खामगाव अकोला अकोट या मार्गाने शेकडो किलोमीटर अंतर पार करून पाई चालत शेगावला येताना गण गण गणात बोते चे नामस्मरण करीत मंदिरात पोहोचत होते. श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता ई- पास काढणे जरुरी आहे. मात्र ज्या भाविकांना ई-पास प्राप्त होऊ शकली नाहीअशा भाविकांनी श्रींच्या मंदीराच्या बंद गेट जवळ नतमस्तक होऊन श्रींचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संतनगरी शेगावात लाखो भाविकांचे आराध्य दैवत संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिर दर्शना निमित्त दररोज शेकडो भाविक येत असतात. मध्यंतरी कोरोना  मुळे जवळपास दीड वर्ष मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते तरीसुद्धा भाविका मधील श्रद्धा कमी न होता शेकडोंच्या संख्येने भाविक गुरुवारी एकादशी तिथी चतुर्थी व इतर पावन समजल्या जाणाऱ्या दिवशी बंद गेटवरच नतमस्तक होऊन भाविक श्रद्धेने श्रींचे दर्शन घेताना दिसत होते. शेगाव शहरात आज पहाटेपासूनच गण गण गणात बोते श्रीराम जय राम जय जय राम असे नामस्मरण करीत लहानापासून मोठ्यापर्यंत कडाक्याच्या थंडीची कोणतीही पर्वा न करता शेकडो किलोमीटर पायी चालत शेगावला पोचत होते त्यामुळे वातावरण गजानन मय झालेले दिसत होते. श्री संत गजानन महाराज मंदिर मध्ये श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची श्रींचे दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरितात्याचप्रमाणे राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांची कुठे ही पायमल्लि होऊ नये याकरिता श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने मंदिर आवारात अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे कोणत्याही ठिकाणी स्पर्श न करता जागोजागी सॅनिटायझर, ग्रामीण ठेवण्याची विशिष्ट जागा, हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था बाळाची व्यवस्था तेसुद्धा  ॲटोमॅटीक सिस्टीम द्वारे, सोशल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन अशी व्यवस्था संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठ दादा पाटील संस्थानचे विश्वस्त हरिदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था ठेवण्यात येत होती त्यामुळे श्रींचे दर्शन घेऊन मंदिराची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त करताना दिसत होते.
     

    Post Views:  279


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व