महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2024, 2:24 PM
   

अकोला : महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दि. 16 मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आल आहे. हे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे आहे. वयोगट 18 ते 45 वर्षांदरम्यान व दहावी उत्तीर्ण व्यक्तीला प्रवेश मिळू शकेल. प्रशिक्षणात ब्युटीपार्लर, केशरचना, मेकअप आदी बाबी प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जातील. त्याशिवाय, व्यक्तिमत्व विकास, उद्योग नोंदणी, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रक्रिया व विविध योजनांची माहिती दिली जाईल.  अधिक माहितीसाठी कल्याणी तिजारे यांच्याशी 9822391337 व वृषाली काळणे यांच्याशी 9373996027 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे व प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे. 

    Post Views:  183


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व