मोठी उमरी अकोला येथे संत तुकाराम महाराज पुण्यस्मरण दिन
मंदिरासाठी श्री.रामेश्वरभाऊ फुंडकर यांची रू.२१ हजारांची देणगी
अकोला- कुणबी समाज मंडळ मोठी उमरी अकोला चे वतीने श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर मोठी उमरी अकोला येथे श्री संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज पुण्यस्मरण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ह. भ. प. डॉ. हरिदास महाराज आखरे, शेगाव यांचे श्री संत तुकाराम महाराज यांचे जिवनावर प्रवचन संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. श्री संतोषजी भोरे लाभले. मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन थोरात यांनी मंदिराचे बांधकामाबाबत व देणगी बाबत प्रस्तावना
सांगितली.
अकोला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष श्री रामेश्वरभाऊ फुंडकर यांनी संत तुकाराम महाराज मंदिरासाठी रू.२१ हजारांची देणगी जाहिर केल्याची माहिती देण्यात आली.नंतर देणगीदारांचा सन्मान चिन्ह व दुपटा देऊन सन्मान करण्यात आला. नंतर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ. घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गजानन थोरात, उपाध्यक्ष विठ्ठल माहोकार, सचिव देविदास पोटे, आत्माराम शेळके, डॉ. दिनकरराव चांदणे, रामेश्वरभाऊ चांदणे, महादेवराव नळे, सुरेशभाऊ पोतले, विठ्ठल लोथे, अनिल गावंडे, आनंदराव काळे, भोरे सर तेल्हारकर साहेब, मनिष नळे, दहीभात सर, गुजरात सर, ईत्यादि समाज बांधवांनी परिश्रम घेतले
Post Views: 223