जीपीए अकोला अध्यक्षपदी डॉ. सतीश उटांगळे तर सचिवपदी डॉ. विनय दांदळे यांची निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 Dec 2023, 1:11 PM
   

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार , २३ डिसेंबर २०२३ रोजी जीपीए हॉल मध्ये जीपीए अध्यक्ष डॉ. सुनील बिहाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . या आमसभेत मागील कार्यकारिणीच्या २०१८ - २०२३ ह्या कार्यकाळात संपन्न झालेल्या उपक्रमांची माहिती सचिव डॉ . संदीप चव्हाण यांनी आपल्या अहवालात सादर केला.
ह्या आमसभेनंतर निवडणूक अधिकारी डॉ . चंद्रकांत पनपालिया आणि डॉ. सुनील फोकमारे यांचे मार्गदर्शनात २०२४ - २०२७ ह्या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणी अविरोध निवड करण्यात आली . ह्यामध्ये 
अध्यक्ष म्हणून डॉ . सतीश उटांगळे तर सचिव म्हणून डॉ . विनय दांदळे आणि कोषाध्यक्ष पदी डॉ . आदित्य नानोटी यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रवीण अग्रवाल आणि डॉ . संदीप चव्हाण ह्यांची तर   सहसचिव म्हणून डॉ . दीपाली भांगडीया यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून 
डॉ . नरेंद्र श्रीवास , डॉ . प्रियंका देशमुख , डॉ . संजय तोष्णीवाल , डॉ . प्रद्युम्न शाह , डॉ . चंद्रकांत वाघमारे , डॉ . अनिरुद्ध कुळकर्णी  यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.  मार्गदर्शक सदस्य  डॉ.अनुप कोठारी , डॉ.किशोर मालोकार, डॉ.चंद्रकांत पनपालिया ,डॉ.सुनिल बिहाडे , डॉ.राजेंद्र अग्रवाल म्हणून ह्यांची निवड करण्यात आली.
ह्या सर्वसाधारण सभेला जीपीएचे सदस्य  , डॉ . अशोक ओळंबे , डॉ . सुनील फोकमारे , डॉ . महेश कुळकर्णी , डॉ . रवी अलिमचंदानी , डॉ . मनोहर घुगे , डॉ . अनिल तोष्णीवाल ,डॉ . राजेश अग्रवाल , डॉ . गिरीष अग्रवाल ,  डॉ . अजय पाटील , डॉ . तुषार माळोकर , डॉ . नरेंद्र गोंड , डॉ . पांडुरंग धांडे , डॉ . प्रशांत सांगळे , डॉ . प्रवीण अग्रवाल , डॉ . सुनील लुल्ला , डॉ. युवराज देशमुख , डॉ . आनंद चतुर्वेदी डॉ . अजय पाटील , डॉ . अरविंद गुप्ता , डॉ . राजू देशपांडे यांचेसह जीपीए चे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते .

    Post Views:  89


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व