अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ \'जोडे मारो\' आंदोलन*


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Aug 2026, 10:40 AM
   

अकोला : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले आहेत. या अपमानास्पद विधानाचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अकोला ग्रामीण आणि शहरच्या वतीने जोरदार ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
मा.जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात मा.श्री. मदनजी भरगड यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्रास जोडे मारून आपल्या तीव्र संतापाची व रोषाची भावना व्यक्त केली. या समयी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
"महिलांचा अवमान करणाऱ्या अशा प्रकारच्या असभ्य व खालच्या पातळीवरील वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते," असे यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले....
प्रमुख उपस्थिती : या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भैया भरगड, प्रदेश सरचिटणीस श्रीमती मंदाताई देशमुख,प्रदेश सरचिटणीस श्रीमती राधाताई बिडकर, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मीबाई सरिसे,माजी महिला जिल्हाध्यक्ष  रुपाली वाकोडे विनोदभाऊ थुटे जिल्हा महासचिव, बाळा साहेब तायडे,सुरेश रामेकर,गजानन पाटील, रामा अमानकर,गौरव देशमुख,राजेश मालोकर,रश्मी पाटेकर,कल्पना बिडवे,सिंधुताई पवार,काशिनाथ पाटेकर,दीपक गावंडे,सुधीर साखरकर,शंकर कंकाळ,दीपक नाकट,पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व