दिव्यांग सोशल फाउंडेशन साठी संगीतकार कौशल इनामदार यांची मैफिल अकोल्यात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 May 2023, 2:37 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संपूर्ण भारतभर प्रा विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणजे रविवार 28 मे २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला येथे संगीतकार कौशल इनामदार यांची संगीत मैफिल रंगणार आहे . ही मैफिल दिव्यांग बांधवांना समर्पित असल्याचे संगीतकार कौशल इनामदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकात सांगितले . या कार्यक्रमात दिव्यांगाना व्हीलचेअर , व्हाईट केन , ब्रेल बुक्स व शिष्यवृत्तीचे वाटप संस्थेतर्फे केले जाणार त्याच बरोबर राष्ट्रीय स्तरावरून दिव्यांग कवी आपली प्रस्तुती कार्यक्रमात देणार आहे . तबल्याची साथ सिद्धेश्वर टीकार तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.विशाल कोरडे व अनामिका देशपांडे करणार आहेत . स्वागताध्यक्ष म्हणून एडवोकेट मोती सिंग मोहता तर प्रमुख उपस्थिती अभिनेत्री इरावती लागू , प्रा.मुकुंद पाध्ये , सौ.भारती शेंडे ,समाज कल्याण अधिकारी डी एम पुंड श्री.पवन माहेश्वरी , अकोला आकाशवाणी प्रमुख विजय दळवी , डॉ.उज्वला मापारी , अंबुजा ओईल लिमिटेड चे ब्रिजमोहन चितलांगे व शैलेश खरोटे उपस्थित राहणार आहेत . या संगीत मैफिलीला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा , प्रवेशिका मिळवण्यासाठी व दिव्यांग नोंदणीसाठी संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक ९४२३६५००९० वर संपर्क साधावा असे आव्हान आयोजन समितीचे डॉ.संजय तिडके , प्रा.अरविंद देव , पूजा गुंटीवार , हेमंतकुमार शाह , महेंद्र कोकणे ,उत्कर्ष जैन ,वंदना तेलंग ,शुभांगी मानकर , विनोद टिकार , दिपाली चिकटे व स्वप्नाली जहागीरदार  यांनी केले आहे .

    Post Views:  109


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व