सरल पोर्टल वरील आधार कार्ड मिस मॅच असलेले विद्यार्थी invalid ठरवण्यात येऊ नये


महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे विनंती
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Mar 2023, 9:16 AM
   

अकोला : गेल्या वर्षभरापासून सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करण्याचे कार्य शाळा स्तरावर सुरू आहे. यामध्ये 90% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सरल पोर्टल वर अपलोड झाले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरिल माहिती ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव,आडनाव जन्मतारीख यामध्ये एका शब्दाचा जरी तफावत असला तरी सरल पोर्टलवर सदर विद्यार्थी Invalid दाखवत आहे.
      नुकतेच राज्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक साहेबांचे दिनांक 23 फेब्रुवारी 2023 च्या पत्रानुसार ज्या विद्यार्थ्यांचे सरल पोर्टल मधील माहिती व आधार कार्ड वरील माहिती जुळत नाहीत असे Mis-/Match असलेले विद्यार्थी Invalid ठरवले जाणार असुन सत्र 22-23 च्या संच मान्यतेसाठी ग्राह्य ठरवल्या जाणार नसल्याची सूचना पत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत.
       त्यामुळे सरल पोर्टल वर आधार अपलोड केलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावे. Mismatch असलेले विद्यार्थ्यांना Invalid करू नये. याबाबत अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.वैशाली ठग मॅडम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे, उपाध्यक्ष अतिकुर रहेमान, उपाध्यक्ष अल्केश खेंडकर, सरचिटणीस मोहम्मद जावेदुजमा, सहसचिव नरेंद्र चिमणकर , मोहम्मद शोएबुद्दीन, जयसिंग मचले, अविनाश खंडारे, सुवर्णाताई वरोकार, रजनीताई अरबाड, दत्ता घोंगे, शेख समीर, इमरान सर, अमीर सर, मीनाज सर, अहरार सर, वसीम उल रहमान, सय्यद सलीम, गजानन पाडकर यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

    Post Views:  190


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व