बजाज फायनान्स कंपनीकडून राजेश दिनोदिया यांची फसवणूक*
- ग्राहक मंच,जिल्हाधिकारी व पोलिसांकडे तक्रार
- उमेश इंगळे
अकोला.. - स्थानिक अकोल्यातील शालिनी टॉकिज जवळील राजेश दिनोदिया या व्यक्तीची बजाज फायनान्स कडून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी दिलेली लेखी तक्रार, कंपनी प्रतिनिधींनी त्यांना दिलेली तोंडी आश्वासने आणि नंतरच्या खाते स्टेटमेण्ट वरून समोर आला आहे.
राजेश दिनोदिया या व्यक्तीला बजाज फायनान्स कंपनीकडून वैयक्तिक लोनसाठी फोन आला होता. त्या फोन द्वारे त्यांना १ लाख २६ हजार रुपये ऑफर असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे बजाज फायनान्स चे अगोदर चे जुणे कर्ज ३६ हजार रुपये बाकी होते. ते ३६०० न भरता त्यांना फक्त २२ हजार रुपये भरावे लागतील. म्हणजे एक लाख २६ हजार मधून २२ हजार रुपये कमी होऊन त्यांच्या अकाउंटला १ लाख ४ हजार रुपये जमा होतील असे बजाज कंपनीकडून सांगण्यात आले होते.
परंतू तसे काहीही न घडता दिनांक १२ मार्च २०२४ रोजी राजेश दिनोंदिया यांच्या बँक खात्यामध्ये १ लाख २६ हजार रुपये जमा झाले. त्यांचे २२००० कमी झाले नसल्यामुळे ते बजाज फायनान्स च्या ऑफिसला जाऊन त्यांनी तक्रार केली. तेथे त्यांना व्यवस्थित स्पष्टीकरण न देता, अत्यंत उद्धटपणाची व अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यांनी आपल्या बँकेच्या खात्यामध्ये आलेल्या पैशाबद्दल विचारपूस केली असता, त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या अकाउंटला १ लाख ४१ हजार रुपये जमा झाले असून त्याचे व्याज धरून तुम्हाला १ लाख ९८ हजार २७२ भरावे लागतील. राजेश दिनोदिया हे मजुरी करणारे व्यक्ती एवढे पैसे भरू शकत नसल्यामुळे त्यांनी आलेले १ लाख २६ हजार रुपये बजाज फायनान्स ला परत द्यायचे कबूल केले.परंतू बजाज फायनान्स कडून त्यांना सांगण्यात आले की कमीत कमी सहा इंस्टॉलमेंट तुम्हाला भरावे लागतील त्यानंतर तुमचे १ लाख २६ हजार जमा करता येतील. राजेश दिनोदिया यांना कर्जाची आवश्यकता नसतांनाही त्यांच्या खात्याला १ लाख २६ हजार रुपये जमा झाले. आता त्यांना १ लाख ९८ हजार २६२ रुपये त्यांना भरायचे आहेत असे सांगण्यात आले असून, त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार केलेली आहे.
त्यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या माध्यमातून ग्राहक तक्रार मंच पोलीस अधीक्षक यांच्या कडे सदर प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली आहे. न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली करून . बजाज फायनान्स कंपनीवर वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बजाज फायनान्स कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजेश दिनोदिया यांनी दिला आहे.
Post Views: 363