या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था यांनी सहभागी व्हावे. तसेच नागरिकांनी आपापल्या घरीही संविधान उद्देशिकेचे वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे संविधान उद्देशिकेच्या ७५ हजार प्रति वितरीत करण्यात येणार आहेत. या प्रति शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सर्व शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वितरीत करण्यात येतील. सर्व शाळा महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन होईल. जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी ११ वाजता होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनीकेले आहे. याकार्यक्रमास उपस्थितीचे तसेच जिल्ह्याभरातील सर्व कार्यक्रमांमधील सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.












