धामणगाव रे तालुका स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कु. वृंजल देशमुख प्रथम तर कु. सृष्टी फरकाडे व्दितीय


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jul 2024, 10:10 AM
   

(सचिन ठाकूर) धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शिक्षण विभाग प. स. धामणगाव रे, विज्ञान अध्यापक मंडळ धामणगाव रे, मुख्याध्यापक संघ धामणगाव रे, व विद्यानिकेतन सी. बी. एस. ई स्कूल धामणगाव रे यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव रे तालुका स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा प्राचार्य रविकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 जुलै 2024 ला विद्यानिकेतन स्कूल धामणगाव रे. येथे संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार अधिकारी नारायणराव अतकरी,विस्तार अधिकारी स्वप्ना भोगावकर,विस्तार अधिकारी साबीर खान, संचालक राजेन्द्र जोशी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलींद देशमुख, तालुका विज्ञान समन्वयक कलेश कांबळे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनंत डुमरे, कार्याध्यक्ष अविनाश चाफले,सचिव संजय शिरभाते उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. उदघाटन विस्तार अधिकारी साबीर खान यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात से. फ. ला. हायस्कूल धामणगाव रेल्वे ची कु. वृजल नितीनराव देशमुख हिने प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांक विद्यानिकेतन स्कूल धामणगाव रे ची कु सृष्टी फरकाडे हिने प्राप्त केला. तर प्रोत्साहन क्रमांक डॉ. एम के. पवार पब्लिक स्कूल जुना धामणगाव येथील कु. सेजल राहुल काळे हिने पटकाविला. एकुण 15 विद्यालयानी  सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. मायाताई कस्तुरे व प्रा डॉ घोगरे सर आदर्श महाविद्यालय धामणगाव रे. हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनंत डुमरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, तथा विद्यानिकेतन स्कूल च्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विज्ञान शिक्षक हर्षल नरोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    Post Views:  132


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व