छावा संघटनेने समाजसेवेचा जपला शब्द 100 विद्यार्थ्यांना वॉटर बॅगचे वितरण
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Jun 2025, 10:15 AM
अकोला : रक्तदानासारख्या पवित्र व अत्यावश्यक उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारी छावा संघटना समाजसेवेच्या कार्यातही आपला ठसा उमटवीत आहे. छावा चे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेच्या कार्यासाठी छावा ची टीम सज्ज झाली आहे. या समाजसेवेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला येथून जवळच असलेल्या आळंदा गावातील १०० विद्यार्थ्यांना छावा संघटनेतर्फे उत्तम दर्जाच्या वॉटर बॅग चे वितरण करण्यात आले. येथील प्रख्यात समाजसेवक रितेश मिर्झापूरे यांच्या सहयोगातून आळंदा येथील खंडेराया मंदिराचे प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता छावा चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, रितेश मिर्झापुरे, अनिरुद्ध भाजीपाले, प्रमोद पाटील या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.
जय हनुमान व्यायाम शाळा आळंदा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष दिलीप ढोरे, उपाध्यक्ष सुनील खाडे, सचिव रमेश नागे, यांचे सह विशाल बेंद्रे, बंटी बावस्कर, सचिन खाडे, वैभव काळे, सतीश वानखडे, नंदू खाडे, आकाश खाडे, बबलू खाडे आदींचे सहकार्य लाभले. याप्रसंगी व्यायामशाळेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी १४ मे रोजी अकोला येथे संपन्न झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सोहळ्यात भाग घेऊन आपापल्या कला सादर केल्या होत्या. छावा चे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांनी सुरू केलेल्या छावा संघटनेच्या या समाजसेवेच्या उपक्रमात छावा चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. दीपक मोरे, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. संजय सरोदे, प्रदीप खाडे, डॉ. किरण लढा, डॉ. विनीत हिंगणकर, अरविंद कपले, डॉ. रणजीत कोरडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. एस. एम. अग्रवाल, डॉ. उमेश गडपाल, डॉ. निलेश दायमा, योगेश गोतमारे, अमोल हिंगणे, बबलू वसु, अनिरुद्ध भाजीपाले, मनोहर मांगटे पाटील, श्याम कोल्हे, निवृत्ती वानखडे, अरविंद बाणेरकर, श्याम कुलट, प्रकाश गवळी, रणजीत ठाकरे, श्रावण लांडे, आशिष कापसे, भारत भडांगे आदी सहकार्य करीत आहेत. भविष्यातही विविध गावांमध्ये जाऊन हे समाजसेवेचे उपक्रम राबविले जातील अशी माहिती शंकरराव वाकोडे यांनी दिली आहे.
Post Views: 27