दिव्यांग सुरक्षा कायद्यानूसार कार्यवाही करा; खामगाव पंचायत समिती कडे क्षत्रुधन ईंगळेंची मागणी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Feb 2024, 2:00 PM
   

खामगाव : दि. 05/02/2024 ला खामगाव पंचायत समितीला दिव्यांग समस्या बाबत तातडीचे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी राजपुत यांना विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन च्या वतीने  दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात प्रहार शहराध्यक्ष क्षत्रुधन यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले.
१) दिव्यांग स्वनिधी ५% वाटपामध्ये ग्रामपंचायतींनी वर्ष २०२१ ते २०२४ आर्थिक वर्षाचे वाटप केलेले नाही त्यांच्या थकितसह आजतागत निधीचे वाटप करण्यात यावे २) काही ग्रामपंचायती मध्ये भेदभावपूर्ण वागणुक प्रमाणे निधी वाटप केला आहे तो सरसकट वाटपाचे ३१ मार्च २०२४ पुर्वी आदेशित करावे. ३) घरपट्टीमध्ये दिव्यांग पालकांना ५०% करमाफीची सुट मिळत नाही ती देण्यात यावी. ४) घरकुल मध्ये प्राथान्य लाभार्थी म्हणुन दिव्यांग आदेशित असतांनाही त्यांना स्थान देण्यात. येत नाही त्यांना न्याय देण्याचे करावे. ५) आपल्या कार्यक्षेत्रातील युडिआयडी प्रमाणपत्र धारक दिव्यांगांची यादी त्यांच्या टक्केवारीसह ऊपलब्द करुन देण्यात यावी व प्रत्येक ग्रामपंचायतीला दर्शनी भागावर लावण्यात यावी. ६) २०० फुट जागा ग्रामपंचायत हद्दीतील ती दिव्यांगाना उपलब्ध करून देणे ७) दिव्यांग संरक्षण कायदा २०१६ अन्वेय येत्या पंधरा दिवसात दिव्यांग बांधवांना न्याय
देण्यात यावा, या निवेदनानुसार रास्त कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गेने आंन्दोलन करु व त्याची संपूर्ण जवाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहिल करिता हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाच्या प्रतिलीपी - 
 नामदार बच्चुभाऊ कडु अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग,जिल्हाधिकारी बुलढाणा,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत यावेळी प्रहार शहाध्यक्ष क्षत्रुधन ईंगळे,शेखर तायडे,उमेश देशमुख,मोहम्मद रईस,वसंत चिखलकर,मधुकर पाटील पद्माकर धुरंधर आदी हजर होते.

    Post Views:  242


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व