Big Breaking : मुंबईतील शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार?


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Jul 2022, 10:25 AM
   

मुंबई : राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. एकनाथ शिंदे गटाचे पुढील लक्ष्य आता शिवसेना भवन असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गट स्वतंत्र शिवसेनेची नोंदणी करताना हा नवा डावपेच आखणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य शिवसेना भवनवर ताबा करण्याचं असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वत:चीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे.

दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात यश आलेल्या शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वत:ची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतदेखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखण्याचं स्पष्ट आहे. 

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व