उपमुख्याध्यापक विष्णू मोरे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार- २०२२


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-11-02
   

 पुणे :  सरदार वल्लभभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकात्मता दिन व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निती आयोग भारत सरकार,दिल्ली संलग्नित डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलचे उपमुख्याध्यापक विष्णू मोरे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार-२०२२  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रवींद्र चौधरी, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, प्रसिद्ध उद्योजक दिव्यकांत नारखेडे, वीरेंद्र झोपे, डॉ.अशोक पाटील उपस्थित होते. महिलाश्रम हायस्कूलचे उपमुख्याध्यापक विष्णू मोरे यांना हा पुरस्कार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला.
आजपर्यंत त्यांना पुणे भूगोल शिक्षक संघ, लायन्स क्लब पुणे आनंद,  डॉ.मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

    Post Views:  201


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व