स्थानिक मोठी उमरी स्थित - डवले पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावी बोर्ड शैक्षणिक सत्र २०२४-२५ चा रिझल्ट जाहीर झाला. त्यात डवले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'नेत्रदीपक यश संपादन केले आहे'. यामध्ये डवले पब्लिक स्कूल फुल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्वरित दावेदार याला ९७ टक्के गुण मिळाले असून शाळेतून प्रथम आलेला आहे. गणित या विषयात त्याला १०० पैकी १०० गुण मिळाले तसेच सायन्समध्ये १०० पैकी ९८ गुण, सोशल सायन्स १०० पैकी ९७ गुण मिळाले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दुसरा क्रमांक जानवी बेले या विद्यार्थिनींचा आहे. तिला ९२.२० टक्के गुण मिळाले आहे. सेमी इंग्लिश शाळेचा विद्यार्थी चेतन लाड हा शाळेतून प्रथम असून त्याला ८९ टक्के गुण मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश डवले सर, संस्थेच्या सचिव आ. मृणाली डवले मॅडम, संस्थेचे संचालक आ. डॉ. अभिजीत डवले सर, फुल इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका कल्याणी हनवंते मॅडम, सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता धनोकार मॅडम यांना दिले आहे. शाळेत सातत्यपूर्ण होणाऱ्या चाचण्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष, त्यांना येणाऱ्या अभ्यासासंबंधीच्या अडचणी त्या सोडवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. यामुळेच विद्यार्थ्यांना नेत्रदीपक यश मिळाले आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून त्यांच्या नेत्रदीपक यशाचे कौतुक केले आहे. सर्वत्र शाळेत आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. सर्व पालकांनी संस्थेचे अध्यक्ष डवले सर, सचिव मृणालिनी डवले मॅडम, अभिजीत सर यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेले मोलाचे मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार मानले आहे.
Post Views: 86
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay