आषाढ एकादशी निमित्त आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयाने काढली आकर्षक दिंडी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Jul 2024, 3:42 PM
   

तेल्हारा : आषाढी एकादशी निमित्त आसूडल येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयाने आकर्षक दिंडी काढून सर्व ग्रामवाशांची मने जिंकली. हरिनामाचा गजर करीत ही दिंडी गावातील प्रमुख रस्त्याने निघाली तेव्हा गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दिंडीचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा आकर्षणाचा विषय ठरल्या. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी फेटे बांधले होते. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ,मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव ,तुकाराम असा  हरिनामाचा गजर दिंडीमध्ये होत होता. विद्यार्थ्यांनी आकर्षक पावली सुद्धा खेळून सर्वांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या हातचे भगव झेंडे वारकरी संप्रदायाची महती सांगत होते. सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाची ओळख आहे. सर्व धर्माच्या लोकांनी विठ्ठल रुक्माई ची पूजन करून दिंडीचे स्वागत केले. 
आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप तसेच स्वादिष्ट मठ्ठा देण्यात आला. दिंडीच्या यशस्वी ते करता विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिरे, शिवराजे जामोदे कविराज, गणेश मानमोडे, अमित गिरे, अक्षय दहे, पुरुषोत्तम इंगोले, गणेश नागडे, विठ्ठल महाले, नंदकिशोर महाले यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  18


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व