देशमुख समाजसेवा मंडळाच्या सचिवावर अगोदरच अविश्वास
वृत्तपत्रातील खुलासा दिशाभूल करणारा...!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 Aug 2022, 7:22 PM
अकोला- अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाच्या सचिवांच्या बाजूनं कोणीही नसतांना एकच व्यक्ती सभासदांची दिशाभूल करणारे खोटे कारनामे करीत आहे.आज त्यांनी वृत्तपत्रात छापलेला खुलासा सुध्दा कायदेशीर निवडणूक प्रक्रिया सहन झाल्याने केलेला दिशाभूल करणारा खोडसाळ प्रयत्न आहे.
कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेतल्याने वादग्रस्त ठरून, त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून कामकाज प्रलंबित असलेल्या अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे सचिव मधुकरराव देशमुख यांचे विरूध्द कार्यकारी मंडळाच्या ११ सदस्यांनी अविश्वास व्यक्त करणारा ठराव अगोदरच पारित केलेला आहे. वर्षानुवर्षांपासून मंडळात सचिव म्हणून आपले कायम बस्तान बसविणाऱ्या सचिवांना ही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी वारंवार संधी देण्यात आल्यात.यावेळी सुध्दा त्यांची समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतू त्यांची अगोदरपासून ही उपद्व्यापी वृत्ती नियंत्रणात न आल्याने मंडळाला अखेर त्यांना बाजूला ठेऊन आमसभा घेण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला.पुढील कार्यकारी मंडळ गठीत होईपर्यंत यानंतरचे कामकाज सहसचिव,पत्रकार संजय माणिकराव देशमुख,निंबेकर यांच्यावर सोपविण्याचा निर्णय झालेल्या सभेत घेण्यात आला.
. रेकॉर्ड दडवून ठेवणे,आर्थिक प्रस्तावांबाबत माहिती न देणे,कोरोना काळ वगळता गेल्या पाच वर्षांत सभा,सर्वसाधारण सभा न घेणे,वारंवार स्पष्टीकरणाला मी राजीनामा दिला व तब्येत बरी नसल्याची दिशाभूल करणारी उत्तरे देणे, फसवून इतरांच्या सह्या घेणे,या सर्व प्रकारांना कंटाळून कार्यकारी मंडळाच्या वर्तमान १५ पैकी ११सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सभेत एका ठरावानुसार सचिवांविरूध्द सर्वसंमतीने अविश्वास पारित केला आहे
मधुकरराव देशमुख यांनी सभासदांच्या याद्या,हिशोब पत्रके आणि तत्सम माहिती मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे वेळोवेळी सादर केलेली नाही. ही वृत्ती समाजाच्या संघटन आणि विकासात अडचण आणणारी अक्षम्य दिरंगाई असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.उलट सर्व मंडळ पदावर कायम असतांना त्यांनी वारंवार चुकीची माहिती देऊन समाजाच्या कार्यात वर्षानुवर्षांचा अपव्यय केला आहे.देशमुख समाजसेवा मंडळ व देशमुख जागृती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विधायक व शांततेच्या मार्गाने हे प्रकरण मिटविण्यासाठी आपसात विचारविनिमय सुरू केले होते.त्यासाठी अध्यक्ष के.एम.देशमुख आणि सचिवांना भेटून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची विनंती केली,व ती त्यांनी मान्य केली होती.परंतू सर्व सदस्यांचा विश्वासघात करीत त्यांनी हे प्रकरण लांबवत ठेवण्यासाठी आपसातील वादाचे खोटे कारण देऊन सहा.धर्मादाय आयुक्तांकडे त्यांचे मार्फत मंडळ निवडण्याचा प्रस्ताव सादर केला.त्यामध्ये शुभम्भवतुमध्ये ६३० पेक्षा जास्त सभासदांची माहिती असतांना २५६ सभासद असल्याचे दर्शविले आहे. म्हणून ११ सदस्य व मंडळातील राजाभाऊ देशमुख,कवठळकर यांनी याप्रकरणी वास्तव परिस्थिती दर्शविणारी हरकत पत्रे सादर केलेली आहेत.
शांततेच्या विधायक मार्गाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती सहसचिव संजय एम.देशमुख यांनी एका पत्राद्वारे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेली आहे.म्हणून त्यांनी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी दि.२४ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली आमसभा घटनाबाह्य असल्याचा वृत्तपत्रात दिलेला खुलासा दिशाभूल करणारा आणि खोडसाळ स्वरूपाचा आहे.या प्रकरणी त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांनाही विश्वासात घेतले नसल्याचे समजते.अध्यक्षांनाही अंधारात ठेऊन त्यांची वेळोवेळी फसगत केलेली आहे.म्हणून त्यांनी दिलेल्या खुलाशावर मंडळाच्या सभासदांनी विश्वास ठेऊ नये.असे सहसचिव संजय माणिकराव देशमुख यांनी कळविले आहे.
Post Views: 578