अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई


 स्वप्निल देशमुख  29 Jan 2023, 1:07 PM
   

संग्रामपूर - संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान शिवारातील वान नदीपात्रात अवैध्यरित्या गौण खनिज उत्खनन चालू असल्याच्या माहितीवरून महसूल विभागाच्या अवैद्य गौण खनिज नियंत्रण पथकाने धाड टाकली असता दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान वळगावान नदीपात्रात अवैद्यरित्या रीती वाहतूक करताना एक ब्रास रेती घेऊन जाणारे ट्रॅक्टर पकडले वाहन चालकास रॉयल्टी विचारली असता त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्याने व अवैद्य उत्खनन चालू असल्याचे समजले त्यावर सदरचे वाहन ताब्यात घेऊन जप्त करून पंचनामा करण्यात आला व वाहन पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले तसेच पुढील कारवाई करिता तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आले. सदरची कार्यवाही तहसीलदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे, बावनबीर मंडल अधिकारी रवींद्र बोराकडे, व तलाठी देवेंद्र बोडखे, डाबरे, सुदेवाड, खरे, कुसळकर आणि कोतवाल अस्वार यांच्या पथकाने रेती माफीयांच्या मुसक्या आवरण्यास सुरुवात केली. तसेच विशेष म्हणजे तालुक्यातील धामणगाव, पळशी, करमोळा, व संग्रामपूर सारख्या ठिकाणी रात्रंदिवस अवैध्य रेती वाहतूक चालू असते परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. कारण डोळे असून आंधळे अशातला काहीसा प्रकार दिसून येते म्हणजेच अधिकाऱ्यांच्या समोरून वाहन जाते परंतु न पाहिल्यासारखे सोंग हे संबंधित अधिकारी व कर्मचारी करतांना दिसून येतात असे प्रकार पाहावयास मिळत असल्याने हे मात्र तालुक्यातील नागरिकांपुढे संशयाचा विषय ठरत आहे. आणि काही अधिकाऱ्यांच्या तोंडून असे सुद्धा बोलल्या जात आहे की आपण कार्यवाही करून रेतीमाफीयांसोबत दुश्मनी घ्यायची आणि वाहन नंतर सोयीस्करपणे सोडून देण्यात येते. त्यामुळे संग्रामपूर तालुक्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येते.

    Post Views:  201


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व