पर्यावरण संवर्धन साठी वृक्षारोपण काळाची गरज : डॉ. उपाध्याय
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
04 Aug 2022, 9:32 AM
अकोला : संपूर्ण संसारात मानव समाजाची व्यवहार संबंधीत विकृती ला एक महत्त्वपूर्ण कारण पर्यावरण असंतुलन होय निरोगी शाररिक, मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक स्वस्थ व्यक्ती साठी जरूरी आहे की निसर्ग संपन्न आणि समृध्द असावे पर्यावरण संरक्षण फक्त वृक्षारोपण नव्हे तर ते प्राकृतिक आधार आहे ज्या मुळे मानव जीवन व जीव जंतू जिवंत राहतात यावरच कृषि व औद्योगिक क्रांती अवलंबून आहे पर्यावरण हे सृष्टि चे आधारभूत जीवन तत्व आहे ह्याचे संरक्षण संवर्धन आम्हा सर्वांसाठी अति आवश्यक आहे स्थानिक कृष्ण नगरी कौलखेड परिसरात एक पाऊल समोर टाकत गायत्री परिवार अकोला शाखा चे डा अजय उपाध्याय हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. उपाध्याय यांनी झाडांच्या महत्त्व बद्दल सांगितले की अनुविकिरण अटॉमीक रेडिएशन सारखे नुकसानकारक प्रभाव पासून झाड आमची सुरक्षा करतात धरतीवर हिरवळ अभिवृद्धी वृक्षारोपण पुष्पवाटिका अभियानाला सर्वांनी आपले नैतिक कर्तव्य समजून सहकार्य करायला हवे.
शहरात पार्क, बगिचे, वृक्ष नसले तर मनोरुग्ण ची संख्या एवढी वाढू शकते की त्यांना सांभाळणे मुश्कील होईल असे पर्यावरण वैज्ञानिक आपल्या अभ्यास द्वारे वॉर्निंग देत आहे आम्ही सर्वांनी जागरूक राहून वृक्षारोपण , वृक्ष संवर्धन जसे पुण्य कर्म केले पाहिजे दिवंगत आत्मा स्मृतीत , नवीन आत्मा जन्म प्रित्यर्थ, विभिन्न संस्कार , उत्सव, प्रसंगी वृक्षारोपण जरूर केले पाहिजे असे संदेश अखिल विश्व गायत्री परिवार अकोला शाखा चे डा अजय उपाध्याय यांनी दिले या वेळी हरी भक्त पारायण श्री बाळू महाराज जोशी, गोपाळराव डायकर, गायत्री परिवार परिजन , श्री गुरूदेव सेवा मंडळ कौलखेड स्वयंसेवक उपस्थित होते सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
Post Views: 237